Nashik News : ग्रंथालयांचे अनुदान आता थेट बँक खात्यात; प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी; नोंदणी करण्याचे आवाहन

संकेतस्थळावर यूझर आयडी, पासवर्ड निर्माण होणार असून ग्रंथालयांना नोंदणी करून अनुदानासाठी लागणारा वार्षिक अहवाल अपलोड करता येणार
Library Grants Now Direct into Bank Accounts Implementation Call for registration nashik
Library Grants Now Direct into Bank Accounts Implementation Call for registration nashikSakal
Updated on

नाशिक : ग्रंथालय संचालनालयाने ई-ग्रंथालय प्रणालीकडे आणखी एक पाऊल टाकले असून ग्रंथालय अनुदान व्यवस्थापन प्रणालीत बदल करण्यात आले आहे. पारंपरिक पद्धतीने करण्यात येणारे अनुदान विषयक कामकाज आता ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.

जिल्हा ग्रंथालय कार्यालयाकडून जिल्ह्यातील ग्रंथालयांना ग्रंथालय अनुदान व्यवस्थापन प्रणाली अंतर्गत नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी https://htedu.maharashtra.gov.in/Login/ संकेतस्थळ ग्रंथालयांसाठी प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येणार आहे.

संकेतस्थळावर यूझर आयडी, पासवर्ड निर्माण होणार असून ग्रंथालयांना नोंदणी करून अनुदानासाठी लागणारा वार्षिक अहवाल अपलोड करता येणार आहे. त्यामुळे ग्रंथालयांना एका क्लिकवर थेट अनुदानाचा लाभ घेता येणार आहे.

ग्रंथालय संचालनालयाने नुकताच ग्रंथालय अनुदान व्यवस्थापन प्रणालीबाबत अध्यादेश काढला होता. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील ग्रंथालय प्रतिनिधींचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडून दोन प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आल्या आहेत.

अशी होती कार्यपद्धती

सार्वजनिक ग्रंथालयांकडून वार्षिक व अंकेक्षण अहवाल जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रत्यक्षात स्वीकारतात. प्राप्त अहवालातील माहितीची पडताळणी केली जाते, प्राप्त निधीची देयके तयार करून कोशागारात सादर केली जातात, जिल्हा ग्रंथालय कार्यालयाकडून संबंधित ग्रंथालयाच्या बँक खात्यावर ‘इसीएस’द्वारे रक्कम जमा केली जाते. पण आता थेट संकेतस्थळावर वार्षिक अहवाल अपलोड करता येणार आहे.

कार्यपद्धतीत झालेले बदल

विद्यमान अनुदान वितरण कार्यपद्धतीत शासनाकडून निधी प्राप्त झाल्यानंतर ग्रंथालय संचालनालयाकडून जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाला निधी मिळत होता. त्यानंतर जिल्ह्यातील शासनमान्य सार्वजनिक वाचनालयांना निधीचे वितरण होत होते. परंतु आता सरकारकडून निधी प्राप्त झाल्यानंतर ग्रंथालय संचालनालयाकडून थेट जिल्ह्यातील शासनमान्य सार्वजनिक वाचनालयांना अनुदानित निधी मिळणार आहे.

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडून मिळणारे अनुदान आता थेट ग्रंथालय संचालनालयातर्फे शासकीय वाचनालयांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील अडीचशेवर ग्रंथालयांना याचा फायदा होणार असून ग्रंथालयांचे अनुदान दोन टप्प्यांत थेट बँक खात्यात जमा होणार आहे.

- सचिन जोपुळे, सहायक ग्रंथालय संचालक, नाशिक विभाग तथा जिल्हा ग्रंथालय अधिकारी, नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.