नाशिक : शेतकऱ्यांना खते उपलब्ध असताना न देणे, जादा दराने खतविक्री करणे याप्रकरणी चांदवड, देवळा, कळवण तालुक्यांतील नऊ कृषी निविष्ठा केंद्राचा परवाना १६ फेब्रुवारी २०२३ पर्यंत निलंबित करण्यात आला आहे. त्यामध्ये लोहणेर, कळवण, दुगाव येथील कृषी निविष्ठा केंद्रांचा समावेश आहे. (licence suspended of investment centre in kalwan deola chandavad due to fertilizers scarcity rates nashik news)
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांच्या आदेशानुसार आणि जिल्हा कृषी विकास अधिकारी रमेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या आठवड्यात अभिजित जमधडे यांच्या नेतृत्वाखालील जिल्हा भरारी पथकाने चांदवड, देवळा व कळवण तालुक्यांतील खतविक्री केंद्रांची तालुका भरारी पथकासमवेत तपासणी केली होती.
या वेळी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अभिजित घुमरे, तालुका कृषी अधिकारी विलास सोनवणे, मीनल म्हस्के, कृषी अधिकारी राहुल आहेर, किरण शिंदे, नलिनी खैरनार उपस्थित होते. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकरी वेशात सत्यतेची पडताळणी केली. त्यानंतर ९ खत विक्रेत्यांची सुनावणी श्री. सोनवणे यांच्याकडे झाली. उपलब्ध पुरावे आणि लेखी म्हणण्याच्या आधारे परवाने निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा : मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय
खत विक्रेत्यांनी केंद्राच्या दर्शनी भागात खतसाठा आणि किमतीची माहिती लावावी. खताचे लिंकिंग होणार नाही आणि जादा दराने विक्री होणार नाही याची काळजी घ्यावी. शेतकऱ्यांना खतांचे पक्के बिल द्यावे. अनुदानित खतांची विक्री ई-पॉस यंत्राद्वारे करावी.
हलगर्जी केल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा श्री. सोनवणे यांनी दिला आहे. श्री. शिंदे म्हणाले, की शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडून कृषी निविष्ठा खरेदी केल्यावर बिलपावती घ्यावी. विक्रेते पावती देत नसल्यास अथवा जादा दराने विक्री करत असल्यास आणि खते उपलब्ध असताना देत नसल्यास कृषी विभागाकडे तक्रार द्यावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.