NMC News : शहरातील 49 रुग्णालयांना परवाना रद्दचा इशारा

Nashik Municipal Corporation News
Nashik Municipal Corporation Newsesakal
Updated on

नाशिक : महापालिका (NMC) हद्दीतील रुग्णालयांना विविध रुग्णसेवेचे दरपत्रक दर्शनी भागात लावण्याच्या सूचना देऊनही पालन होत नसल्याने वैद्यकीय विभागाने ४९ रुग्णालयांना नोटिसा पाठवत परवाना रद्द करण्याचा इशारा दिला आहे. (License cancellation warning for 49 hospitals by nmc for Violation of Notice to Facade of Tariff nashik news)

कोविड कालावधीमध्ये रुग्णांची मोठ्या प्रमाणात लूट होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने महाराष्ट्र शुश्रूषा अधिनियमांमध्ये सुधारणा केली त्यात रुग्णालयाने रुग्णालयाच्या दर्शनी भागात रुग्णालयाच्या विविध सेवांचे दरपत्रक व रुग्ण हक्कांची सनद लावणे बंधनकारक करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

राज्य शासनाच्या या आदेशाचा परिणाम अनेक रुग्णांची आर्थिक लूट थांबवण्यात झाला. परंतु कोविडची लाट ओसरल्यानंतर राज्य शासनाने काढलेले आदेश रुग्णालय विसरले व शासनाकडूनदेखील त्याची गांभीर्याने दखल घेतली गेली नाही.

मात्र महापालिकेकडे प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार महाराष्ट्र दुसरा अधिनियम सुधारित २०२१ नुसार खासगी रुग्णालयांनी रुग्णालयाच्या दर्शनी भागात रुग्णालयाचे दरपत्रक व रुग्णहक्क सनद लावणे बंधनकारक करण्याची आठवण रुग्णालयांना करून दिली.

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

Nashik Municipal Corporation News
Fire Drill : पानेवाडी प्रकल्पात इंधन टाकी व्हॉल्वजनवळ आग; सुरक्षा यंत्रणेकडून ‘मॉकड्रील’

शहरातील ५८० खासगी रुग्णालयांना या संदर्भात सूचनापत्रे पाठविण्यात आली. त्यात दरपत्रक लावावे, अशी विनंतीदेखील करण्यात आली. मात्र, रुग्णालयाकडून दखल घेतली गेली नाही. त्यामुळे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने शहरातील ४९ रुग्णालयांना दरपत्रक लावण्याची नोटीस पाठवली. नियमानुसार दरपत्रक लावले नाही तर परवाना रद्द करण्याचा इशारा देण्यात आला.

‘आयएमए’ ला सूचना

वैद्यकीय व्यावसायिकांच्या इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) च्या नाशिक व नाशिक रोड या दोन्ही संस्थांच्या अध्यक्षांना पत्र पाठवून महाराष्ट्र शुश्रूषा अधिनियमाची पालन करावे, अशी सूचना करण्यात आली. अन्यथा नियमानुसार दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा देण्यात आला आहे. अशी माहिती महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली.

Nashik Municipal Corporation News
Nashik News : देशातील जुन्या संचांचे आधुनिकीकरण; 2030 पर्यंत संच चालविण्याचे CEAचे निर्देश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.