Nashik News : आजोबा-वडिलांचा खून करणाऱ्या दोघा भावांना जन्मठेप

Life imprisonment
Life imprisonmentesakal
Updated on

नाशिक : वाडीवऱ्हे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घोटी खुर्द येथे ३० नोव्हेंबर २०१९ ला झालेल्या वडील आणि मुलांच्या खुनात त्यांच्या दोन्ही नातवाला जन्मठेपेची शिक्षा झाली.

वाडीवऱ्हे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील या गुन्ह्यात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जगमलानी यांच्या न्यायालयाने आरोपी राहुल फोकणे व प्रमोद फोकणे या दोघा भावाना जन्मठेप आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

सरकार पक्षांनी दहा साक्षीदार तपासले. सरकारतर्फे सरकारी वकील शिरीष कडवे, ॲड. योगेश कापसे, ॲड. दीपशिखा भिडे यांनी काम पाहिले. (Life imprisonment for two brothers killed their grandfather and father Nashik News)

Life imprisonment
Nashik News: ग्राहक न्याय आयोगाचा महावितरणला दणका! शेतकऱ्यास 6 लाखाची नुकसान भरपाई देण्याचे आदेश

घोटीत ३० नोव्हेंबरला रात्री दीडच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा पदाधिकारी ज्ञानेश्वर काशीराम फोकणे (वय ४८) आणि त्यांचे वडील काशीराम वामन फोकणे (वय ६५) या बाप-लोकांचे खून झाले होते. हे दुहेरी हत्याकांड त्यांची मुले राहुल ज्ञानेश्वर फोकणे (वय २५), प्रमोद ज्ञानेश्वर फोकणे (वय २३), नितीन ज्ञानेश्वर फोकणे (वय २०) यांनी केला असल्याचे स्थानिक गुन्हा शाखेने उघडकीस आणले होते.

याप्रकरणी न्यायालयाने राहुल व प्रमोद यांना वडील आणि आजोबा यांचा खून केला म्हणून जन्मठेपेची शिक्षा आज सुनावली, तर नितीन याला निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. पोलिसपाटील कैलास बहिरू फोकणे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला होता.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

Life imprisonment
Nashik News : टपाल पार्सल सेवेच्या सिस्टीममधून चीन Out! कोरोना प्रादुर्भावामुळे पार्सल सेवा बंद

इगतपुरी तालुक्यातील घोटी खुर्द येथे ज्ञानेश्वर काशीराम फोकणे (वय ४८) हे पत्नी आणि तीन मुलांसह रहायचे. ज्ञानेश्वर यांचे अनैतिक संबंध असल्याने कर्जामुळे जमीन आणि हॉटेल विक्रीचे त्यांचे प्रयत्न सुरू होते.

वडिलांच्या जमीन विक्रीच्या प्रयत्नांना आजोबाचा पाठिंबा असल्याने नाराज असलेल्या नातवांचा विरोध होता. न्यायालयात दोन्ही भावांवरील आरोप शाबीत झाल्याने त्यांना जन्मठेप शिक्षा सुनावण्यात आली. वाडीवऱ्हे पोलिस आणि स्थानिक गुन्हा शाखेच्या योग्य तपासामुळे हा गुन्हा सिद्ध झाला आहे.

Life imprisonment
Akola School News : थंडीच्या लाटेमुळे शाळेच्या वेळेत बदल करण्याची मागणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.