नाशिक : कधीकाळी गुलशनाबाद ही ओळख जपलेल्या नाशिकनगरीत अद्यापही फुलांचे महत्त्व अबाधित आहे. येथील शेकडो महिलांना हारांच्या निर्मितीतून चांगला रोजगार मिळत आहे. त्यांच्या कष्टातून फुलांच्या असंख्य माळाची निर्मितीही सुरू आहे.
येथील फूल बाजारात फुले व हारांच्या विक्रीतून रोज लाखो रुपयांची उलाढाल सुरू असून त्याद्वारे अनेक महिलांना रोजगार निर्माण झाला आहे. (Life in Balance Hundreds of women are getting financial support through necklace making nashik news)
यंत्रभूमी अशी ओळख मिळविण्यापूर्वी मंत्रभूमी अशी नाशिकची ओळख होती. या काळात शहराच्या चारही दिशांना मोठ्या प्रमाणावर फूल शेती केली जात होती. पंचवटीतील तपोवन, हिरावाडी परिसरात तर ऐंशी- नव्वदच्या दशकापर्यंत मोठ्या प्रमाणावर फुलांचे उत्पादन घेतले जात.
कालौघात अनेकांनी द्राक्षासह इतर पिकांना प्राधान्य दिल्याने फूल शेतीचे क्षेत्र कमी होत गेले, तर हिरावाडी सारखेच तपोवनातही मोठ्या प्रमाणावर बांधकामे झाल्याने फुलशेतीचे क्षेत्रही घटत गेले.
मात्र अद्यापही तालुक्यासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर फुलांचे उत्पादन घेतले जाते, त्यात अर्थातच झेंडूचा वाटा मोठा आहे. कोरोनाकाळात सातपूर अंबड परिसरातील अनेक छोटे उद्योगधंदे बंद पडले. ते नंतरही उभे राहू शकले नाहीत.
त्यामुळे अनेक तरूणांच्या हातातील रोजगारही गेला. या पार्श्वभूमीवर महिलांसह पुरुषांनाही हार तयार करण्याचा रोजगार उपलब्ध झाला आहे. हे हार तयार करणाऱ्या महिलांना संबंधित विक्रेते फुले, धागा, पाने असे सर्व साहित्य पुरवितात. त्याद्वारे या महिलांना शंभर रुपये रोजापासून तीनशे रुपये रोजापर्यंत अर्थांजनही होत आहे.
लड बनविण्याचा दर असा (पाच फूट)-
*झेंडू - ३०० रुपये शेकडा
* गुलछडी (उभी)- ५०० रुपये शेकडा.
* गुलछडी (आडवी) १ हजार रुपये शेकडा.
*अशोकाच्या पानांचा हार- १ हजार रुपये शेकडा.
लटकन (पाच ते दहा फुलांचे)-
* गुलछडी- १ रुपये नग.
* लिली (दहा फुले) - २ रुपये.
* बिजली- १ ते २ रुपये.
"फुलांच्या हाराच्या व लडीच्या निर्मितीतून अनेक महिलांना रोजगार निर्माण होत आहे. यात क्षमेतेनुसार शंभर तीनशे रुपयांचा रोजगार मिळतो."- संतोष मंडलिक, फूल व्यावसायिक
"फुलांची लड बनविण्याच्या कामामुळे अनेकांना कोरोनामुळे गेलेला रोजगार पुन्हा प्राप्त झाला आहे. महिलांना दोन पैसे मिळाल्याचे मोठे समाधान आहे."
- छाया रासकर, फूल व्यावसायिक
हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस
लाखोंची उलाढाल
भल्या पहाटेपासून गणेशवाडीतील फूल बाजार बहरतो. या व्यवसायातील रोजची अंदाजे उलाढाल दोन ते तीन लाखांपर्यंत होते, सणावारांच्या काळात म्हणजे दसरा, दिवाळी, श्रावण मासात ती दुप्पट, तिप्पट म्हणजे आठ ते दहा लाखांपर्यंत पोहचत असल्याचा अंदाज येथे नियमित व्यवसाय करणारांनी व्यक्त केला.
पाचशे कुटुंबीयांना आधार
फुलांची लड व हार बनविण्याच्या कामात शहरातील अनेक कुटुंबे गुंतली आहेत. काही कुटुंबातील सर्वच सदस्य लड तयार करण्याच्या कामास हातभार लावतात, त्या पार्श्वभूमीवर जवळपास पाचशे कुटुंबीयांना फुलांच्या व्यवसायातून रोजगार उपलब्ध झाला आहे.
सेवन्तिकावकुलचम्पकपाटलाब्जै:,
पुन्नामजातिकरवीररसालपुष्पे:।
बिल्वप्रवालतुलसीदलजन्जरीभि
त्वां पुजयामि जगदीश्वर मे प्रसीद।।
नाना सुगंधी पुष्पणि यथाकालोद्भवानि च।
पुष्पान्जलिर्मया दत्त गृहाण परमेश्वर
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.