जायखेडा (जि. नाशिक) : सध्याच्या बदलत्या जीवनशैलीत पशू पक्षी मानवाच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण घटक बनले आहेत. अनेकांच्या घरी पाळीव पशुपक्षी पाहायला मिळतात. याशिवाय काही पर्यटनस्थळांसह नैसर्गिक अधिवासावरील हे पशुपक्षी आपले सोबती बनले आहेत.
त्यांच्या आपल्या सोबतच्या हरकतींमुळे धकाधकीच्या जीवनातही काही आनंदाचे क्षण उपभोगता येतात. मात्र, या परिस्थितीत या पशुपक्षांना त्यांचे नैसर्गिक अन्न न देता मनुष्यप्रमाणेच अन्न दिले जाते. असे अन्न रोज खायला घातल्याने ते पशुपक्ष्यांसाठी जीवघेणे ठरते आहे. (Lifestyle of animals and birds in danger due to unnatural diet Need to create awareness Nashik News)
बहुतांशी घरांमधील पाळीव पक्षांना ब्रेड, पापडी, चिप्स, चपाती, मटण, चिकन अशा प्रकारचे मानवी अन्न दिले जाते. परंतु, ते पशुपक्ष्यांचे आरोग्यासाठी घातक असल्याचे पशुवैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.
मात्र काहीजण प्राणी प्रेमापोटी त्यांना हे अन्न सतत देत असतात. इतकेच नाही तर काही ठिकाणी पशुपक्ष्यांना दिवाळीचा फराळही खायला दिला जातो. त्यांना या अन्नातून अपेक्षित पोषक तत्त्वे मिळत नाहीत. परिणामी, त्यांना विविध व्याधींना सामोरे जावे लागते. त्याचा परिणाम त्यांच्या आयुर्मानावर होतो.
हेही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'
अलीकडच्या काळात मानवाप्रमाणेच पशू पक्ष्यांचीही जीवनशैली बदलली आहे. घरासमोरील अंगणातील शेत शिवारातील धान्याचे दाणे वेचून खाण्याची त्यांची ही सवयच आता लोभ पावत चालली असून चिप्स पॉपकॉर्न सारखे तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाण्याची सवय आपणच त्यांना लावत आहोत.
हे पदार्थ त्यांचे खाद्य नसल्यामुळे त्यांच्या यकृतावर, पचनसंस्थेवर विपरीत परिणाम होत असल्याचे अनेक अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. मानवी खाद्यपदार्थांमुळे पशू पक्षांनाही त्यांच्याप्रमाणेच किडनी, मधुमेह, डोळ्यांचे विकार, कॅन्सर असे गंभीर आजार उद्भवत आहे.
"नागरिकांमध्ये याविषयी जनजागृती करण्याची गरज आहे. नागरिक प्राण्यांवर प्रेम करतात. मात्र, त्यांना कोणते खाद्य द्यावे, याचा पशुवैद्यकीय तज्ज्ञांकडून सल्ला घेतला जात नाही. या चुकीच्या आहार पद्धतीमुळे पशू पक्षांचा जीव धोक्यात आला असून, त्यांनाही मोठ्या आजारांचा सामना करावा लागतो आहे." -डॉ. योगेश खैरनार, खासगी पशुवैद्य, जायखेडा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.