Rain Update : जिल्ह्यात बुधवारपासून (ता. २७) १ ऑक्टोबरपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता इगतपुरीच्या ग्रामीण कृषी हवामान केंद्रातर्फे वर्तविण्यात आला आहे. गणेशोत्सवामध्ये वरुणराजाची हजेरी आज कायम राहिली.
शहर व परिसरात दुपारनंतर सुरु झालेला पाऊस सायंकाळपर्यंत २० मिलिमीटर इतका नोंदवला गेला. (Light to moderate rain forecast in district in 5 days from today monsoon rain presence in Ganeshotsav continues nashik)
शहर आणि परिसरात सोमवारी (ता. २५) सायंकाळी ३०.३ मिलिमीटर पाऊस झाला होता. आज सकाळी संपलेल्या चोवीस तासात तालुकानिहाय झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये असा : मालेगाव-०.९, बागलाण-०.४, कळवण-४.८, नांदगाव-०.१, सुरगाणा-३.६, नाशिक-१०.९, चांदवड-११.३, इगतपुरी-४.२, पेठ-४.४, निफाड-०.४, येवला-०.१, त्र्यंबकेश्वर-०.१, देवळा-३.१. सिन्नर तालुक्यात मात्र पावसाने हजेरी लावली नाही.
दरम्यान, जायकवाडीसाठी नांदूरमधमेश्वर धरणातून आज सकाळपर्यंत जवळपास १३ टीएमसी पाणी रवाना झाले आहे. येत्या पाच दिवसांमध्ये आकाश ढगाळ राहील. तापमान कमाल ३० ते ३१, किमान २१ ते २२ अंश सेल्सिअस, वाऱ्याचा वेग तासाला ८ ते ११ किलोमीटर असा राहील.
मंडलनिहाय पाऊस
(आकडे २४ तासातील मिलीमीटरमध्ये)
० कळवण-१२.३
० नवीबेज-१४.८
० नाशिक-२२.८
० गिरणारे-१८.३
० माडसांगवी-१९.८
० ननाशी-१९.५
० इगतपुरी-१९.५
० करंजाळी-१५.३
० वडनेर-चांदवड-५५.५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.