Diwali Festival 2023 : पाण्यावर पेटणारे दिवे ठरतायेत आकर्षण; विविध साहित्य विक्रीसाठी दाखल

water-based lamps sold in the market on the occasion of Diwali.
water-based lamps sold in the market on the occasion of Diwali.esakal
Updated on

Diwali Festival 2023 : ‘दीपावली मनाई सुहानी, मेरे साई के हाथों मे जादू का पानी’, शिर्डी के साईबाबा चित्रपटातील या गीताचा प्रत्यय सध्या नागरिकांना येत आहे. या गीतात साईबाबांनी पाण्याने दिवे पेटवून चिमुकल्यांची दिवाळी उत्साहात साजरी केली होती.

तो एक चमत्कारच होता. बाजारात पाण्यावर पेटणारी विक्रीस आलेले दिवे, मात्र चमत्कार नसून आधुनिक तंत्र प्रणालीची देण आहे. (lights on water are attractions for diwali nashik news)

दिवाळी सण दीपोत्सवांचा सण असतो. सर्वत्र विविध आकार नक्षीकाम केलेले दिवे, आकाशकंदील पेटवून रोषणाई करत दिवाळी साजरी केली जात असते. यंदा त्यात भर पडली आहे, ती पाण्यावर पेटणाऱ्या अत्याधुनिक दिव्यांची. ६०० ते १ हजार २०० रुपये डझन अशा प्रकारचे दिवे विक्री होत आहे.

प्रथमच अशा प्रकारचे दिवे बाजारात दाखल झाले आहेत. पाण्यावर दिवे पेटणे सामान्य नागरिकांना विशेषतः चिमुकल्यांना आकर्षण ठरत आहे. विशेष म्हणजे वारंवार वापर करता येऊ शकतील, अशा पद्धतीने दिवे तयार करण्यात आले आहे. घोटभर पाण्यावर दिवे पेटत असल्याने नागरिकांना त्यांच्या घरोघरी, कार्यालयात, परिसरात आकर्षक रोषणाई करण्यास उपयुक्त ठरणार आहे. तेल, तूप आणि कापसाची यामुळे बचत होणार आहे.

water-based lamps sold in the market on the occasion of Diwali.
Diwali Festival 2023 : दिवाळीत खासगी बस भाड्यात दरवाढ; अधिक बस चालविण्याचे महामंडळाचे नियोजन

पारंपारिक मातीचे दिवे असल्याने त्यांची तुटपुट होण्याची दाट शक्यता असते. अत्याधुनिक दिवे न तुटणारे आहे. एलईडी बल्ब, अतिशय छोटी बॅटरी (सेल) आणि प्लॅस्टिकपासून तयार केलेली पणती असे पाण्यावर पेटणाऱ्या दिव्यांचे स्वरूप आहे. विशेष म्हणजे चायना वस्तू नसून पूर्णपणे स्वदेशी आहे. दिवाळीसाठी लागणाऱ्या वस्तू, आकाश कंदील विक्रेत्यांकडे अशा प्रकारची दिवे खरेदी विक्री होत आहे.

‘शिर्डी के साईबाबा’ चित्रपटात ‘दीपावली मनाई सुहानी मेरे साई के हाथों मे जादू का पानी’ या गीतात पारंपारिक दिवे साईबाबांनी पाण्यावर पेटवून द्वारकामाई दिव्यांनी उजळून टाकत. चिमुकल्यांची दिवाळी साजरी केली होती. आजपर्यंत गीतातील ते दृश्य नागरिकांच्या स्मरणात आहे. अत्याधुनिक पाण्यावर पेटणाऱ्या या दिव्यांच्या माध्यमातून तेच दृश्य नागरिकांना प्रत्यक्षात अनुभवास मिळत आहे. त्यामुळे दिवाळीच्या यंदाच्या बाजारपेठेचे आकर्षण ठरत आहे.

water-based lamps sold in the market on the occasion of Diwali.
Diwali Festival : पणती, बोळके तयारी करण्याची लगबग; दिवाळीनिमित्त कुंभार व्यावसायिकांची तयारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()