Bank Adhar Link: अवकाळीच्या मदतीसाठी बँक खात्यास आधार लिंक करा; बाधित शेतकऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Nashik District Collector Gangatharan D.
Nashik District Collector Gangatharan D.esakal
Updated on

Bank Adhar Link : सप्टेंबर व ऑक्टोबर २०२२ या कालावधीत अवकाळी पावसाने ज्या शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे नुकसान झाले आहे, त्यांना ऑनलाईन पद्धतीने मदत देण्यात येणार आहे.

मात्र, काही शेतकऱ्यांचे राष्ट्रीयकृत बँक खाते हे आधार लिंक नसल्याने त्यांच्या खात्यावर मदतीचा निधी जमा होत नाही. त्यामुळे सबंधित शेतकऱ्यांनी आपले बँक खाते आधारसोबत लिंक करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केले आहे. (Link Aadhaar to bank account for emergency assistance district Collector gangatharan d appeal to affected farmers nashik news)

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

Nashik District Collector Gangatharan D.
Market Committee Election : माघारीसाठी काउंटडाउन सुरू; मनधरणीसाठी नेत्यांच्या बैठकांना जोर

या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी (ता. १८) दूरदृश्यप्रणालीद्वारे जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी व गट विकास अधिकाऱ्यांची बैठक घेतली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, उपजिल्हाधिकारी भिमराज दराडे उपस्थित होते.

दरम्यान, ७ ते १६ एप्रिल या कालावधीत झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळेही शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे तातडीने पूर्ण करून त्याबाबतचे अ, ब, क, ड प्रपत्र गुरूवार (ता. २०)पर्यंत सादर करावेत, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी या वेळी केल्या.

राष्ट्रीयकृत बँक खात्याशी आधार लिंक करतानाच ग्रामसेवक, तलाठी व कृषी सहायक यांच्याकडे पंचनामे करतेवेळी माहिती द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

Nashik District Collector Gangatharan D.
Heatstroke Room : जिल्ह्यात प्रत्येक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष! ZP आरोग्य विभागाकडून तयारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()