Nashik Crime : राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकून भरवस फाट्यावर दमण येथील दारू घेऊन जाणारा कंटेनर पकडत त्यातील सुमारे १४ हजार दारू बाटल्यांसह ८० लाख ७० हजारांचा ऐवज हस्तगत केला.
यात उत्तर प्रदेशातील एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. (Liquor worth 80 lakhs confiscated Nashik Crime)
रमजान खान सलमान खान (वय २७, नसीरपूर, पृथ्वीगंज, जि. प्रतापगड) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्या ताब्यातील सहाचाकी कंटेनर (एमएच ०४ आरबी ४८६८) यासह १७ हजार २३२ दारूच्या बाटल्यांचे ५०१ बॉक्सही हस्तगत करण्यात आले.
दादरा नगर हवेली आणि दमण दीव येथे उत्पादित होणारी; परंतु महाराष्ट्रात वितरणास प्रतिबंध असलेली दारू कंटेनरद्वारे नेत असताना ही कारवाई करण्यात आली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजयकुमार सूर्यवंशी, संचालक सुनील चव्हाण, विभागीय उपायुक्त बा. ह. तडवी, अधीक्षक शशिकांत गर्जे, ए. एस. तांबारे आदींच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विठ्ठल चौरे, दुय्यम निरीक्षक संजय वाकचौरे, प्रवीण मंडलिक आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.