Ganeshotsav 2023 : गणेश विसर्जनासाठी 27 नैसर्गिक तलाव; महापालिकेकडून 56 कृत्रिम तलावांचे नियोजन

Ganeshotsav 2023
Ganeshotsav 2023 esakal
Updated on

Ganeshotsav 2023 : पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी महापालिकेने विसर्जनासाठी २७ नैसर्गिक, तर ५६ कृत्रिम तलावांचे नियोजन केले आहे. विसर्जन करताना पीओपी मूर्ती नदीपात्रात विसर्जित न करता दान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महापालिकेकडून दरवर्षीप्रमाणेच ‘मिशन विघ्नहर्ता’ संकल्पना राबविली जात आहे. यात पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विसर्जनासाठी पारंपरिक २७ ठिकाणांबरोबरच जलप्रदूषण टाळण्यासाठी ५६ कृत्रिम तलावांची प्राथमिक स्वरूपात यादी जाहीर करण्यात आली आहे.

त्याचबरोबर टँक ऑन व्हिल्स उपक्रम राबविला जाणार आहे. (list of 56 artificial lakes along with 27 traditional places for ganesh idol immersion has announced nashik news)

विभागनिहाय नैसर्गिक विसर्जनस्थळे

- पूर्व : लक्ष्मीनारायण घाट, रामदास स्वामी मठ, मनपा एसटीपी परिसर- आगर टाकळी, नंदिनी गोदावरी संगम.

- सातपूर : गंगापूर धबधबा, सोमेश्वर, चांदशी पूल, मते नर्सरी पूल.

- नाशिक रोड : चेहेडी नदी किनारा, पंचक गोदावरी नदी स्वामी जनार्दन पुलालगत, दसक गाव नदीतीरी, वालदेवी नदीतीरी देवळाली, विहीतगाव, वालदेवी नदीतीरी.

- पंचवटी : राजमाता मंगल कार्यालय, म्हसरूळ सीता सरोवर, नांदूर-मानूर, आडगाव पाझर तलाव, तपोवन, रामकुंड परिसर, म्हसोबा पटांगण, गौरी पटांगण, टाळकुटेश्वर सांडवा.

- पश्चिम : यशवंत महाराज पटांगण, रोकडोबा पटांगण, कपूरथळा पटांगण, सिद्धेश्वर मंदिर, घारपुरे घाट, हनुमान घाट. नवीन नाशिक- पिंपळगाव खांब वालदेवी घाट.

विभागनिहाय कृत्रिम तलाव

- पूर्व : लक्ष्मीनारायण घाट, रामदास स्वामी मठाजवळ, रामदास स्वामीनगर लेन-१ बस स्टॉप जवळ, नंदिनी गोदावरी संगम, साईनाथनगर चौफुली, डीजीपीनगर गणपती मंदिराजवळ, शारदा शाळेसमोर, राणेनगर, कलानगर चौक राजसारथी सोसायटी.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Ganeshotsav 2023
Ganeshotsav 2023: मुंबई नाका मित्रमंडळ साकारतेय राजवाडा

-सातपूर : शिवाजीनगर सूर्या मर्फी चौक, अशोक नगर पोलिस चौक, नंदिनी नदी, नासर्डी पूल, अंबड-लिंक रोड, नंदिनी नदी, आयटीआय पूल, सातपूर, पाइपलाइन रोड, जॉगिंग ट्रॅकसमोर.

- नाशिक रोड : महापालिका शाळा १२५ मुक्तिधाम, शिखरेवाडी मैदान, मनपा नर्सरी जयभवानी रोड, महापालिका क्रीडांगण चेहेडी पंपिंग श्रमिकनगर पुणे रोड, नारायणबापूनगर चौक जेल रोड, राजराजेश्वरी चौक, गाडेकर मळा देवळाली, के. एन. केला विद्यालय.

- पंचवटी : राजमाता मंगल कार्यालय, गोरक्षनगर, आरटीओ कॉर्नर, नांदूर- मानूर, कोणार्कनगर, तपोवन, प्रमोद महाजन गार्डन, सरस्वतीनगर, रामवाडी जॉगिंग ट्रॅकशेजारी.

- पश्चिम : चोपडा लॉन्स पुलामागे गोदापार्क, चव्हाण कॉलनी, परीची बाग, पंपिंग स्टेशनजवळ, फॉरेस्ट नर्सरी पुलाजवळ, गंगापूर रोड, बॅडमिंटन हॉल, येवलेकर मळा, दोंदे पूल उंटवाडी म्हसोबा मंदिराजवळ नासर्डी पूल (नंदिनी नंदी), महात्मानगर पाण्याच्या टाकीजवळ, पालिका बाजार, लायन्स क्लब मैदान, पंडित कॉलनी महापालिका कार्यालयासमोर, शितळादेवी मंदिरासमोर टाळकुटेश्वर मंदिर.

सिडको : गोविंदनगर जिजाऊ वाचनालय, राजे छत्रपती व्यायामशाळेजवळ, जुने सिडको, पवननगर, जलकुंभ हिरे शाळेजवळ सिडको, राजे संभाजी स्टेडीयम, सिंहस्थनगर, मीनाताई ठाकरे शाळा, कामटवाडे, डे-केअर शाळा रामनगर, राजीवनगर.

Ganeshotsav 2023
Ganeshotsav 2023: रविवार कारंजा मंडळ साकारणार केदारनाथचा देखावा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()