Nashik : पोर्टलवर जिवंत शेतकरी मृत! आजादी अमृत महोत्सवाच्या वर्षातच महाराष्ट्रात सरकारचा अजब कारभार!

Subhash Kalu Gite
Subhash Kalu Giteesakal
Updated on

नाशिक : पी. एम. किसान योजनेचा (PM Kisan Yojana) लाभ घेण्यासाठी सिन्नर तालुक्यातील मेंढी गावातील एका शेतकऱ्याने ऑनलाईन अर्ज दाखल केला होता. पण ज्यावेळी त्याला पावती मिळाली त्यावेळी त्याला मोठा धक्का बसला.

हा शेतकरी जिवंत असताना त्याला चक्क मृत दाखवण्यात आलं होतं. त्यामुळे या शेतकऱ्याला पीए किसान योजनेच्या लाभापासून वंचित राहावं लागल्याची घटना महाराष्ट्रात समोर आली. (Live farmer dead registered on pm kisan portal governments strange behavior in Maharashtra Nashik news)

पावती
पावती esakal

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अल्पभूधारक शेतकऱ्यांना लाभ मिळावा या करीता 2018 सालापासून पी.एम किसान योजना चालू केली होती. 2018 साली सिन्नर तालुक्यातील मेंढी येथील शेतकरी सुभाष काळू गिते यांनी पी.एम किसान योजनेचा ऑनलाइन अर्ज दाखल केला होता. मात्र ज्या वेळेस या शेतकऱ्याला पावती हातात मिळाली त्यावेळेस तो त्यात जिवंत असताना देखील मृत घोषित करण्यात आलं होतं. 

सिन्नर तालुक्यातील मेंढी येथील वृद्ध शेतकरी सुभाष काळू गिते यांना २०१९ मध्ये पीएम किसान योजनेंतर्गत दोन हप्त्यांचा लाभ मिळाला होता. मात्र त्यानंतर अचानक योजनेचा लाभ मिळणे बंद झाले. मात्र नंतरच्या काळात कोविडचे संकट आले. त्यामुळे कदाचित योजनेचा लाभ मिळाला. नसेल अशी शक्यता गिते यांनी गृहीत धरली.

गेल्या काही महिन्यांत शासन स्तरावरून पुन्हा शेतकऱ्यांना केवायसीसाठी आवाहन करण्यात आले. त्यामुळे गिते यांनी केवायसी अपडेट करण्यासाठी वडांगळी महा-ई-सेवा केंद्र गाठले. केंद्रचालकाने केवायसी अपडेट करण्यास घेतल्यानंतर त्याला आणि गिते यांनाही धक्का बसला. पोर्टलवर 'बेनीफीशयरी इज इनॅक्टिव्ह ड्यू टू डेथ' जिवंत असूनही मृत्यू कसा झाला असा संदेश दाखविण्यात आला होता.

शेवटचा उपाय म्हणून २७ मार्च २०२३ ला सुभाष गिते यांनी तहसील कार्यालयात तहसीलदारांच्या नावे अर्ज दिला. त्यात घडलेली गंभीर बाब निदर्शनास आणून देऊन पीएम किसान योजनेचा लाभ देण्याची मागणी करण्यात आली. अर्जासोबत बँकेचे पासबुक, आधारकार्ड, पॅनकार्ड व सातबारा उताऱ्याची झेरॉक्स प्रत जोडण्यात आली.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

Subhash Kalu Gite
Nashik News : आश्रमशाळेच्या लाचखोराला अटक

तहसील कार्यालयाने त्यांना तोंडीच दोन-तीन दिवसांत काय ते कळवू असे सांगितले. मात्र, आठ दिवस उलटूनही तहसील कार्यालयातून काहीही विचारणा झाली नाही. त्यामुळे गिते यांनी पुन्हा तहसीलचा उंबरा झिजवत सोमवारी (दि. ३) अर्ज दाखल केला. मात्र, अद्यापही त्यांच्या अर्जाची दखल घेण्यात आलेली नाही

तहसील कार्यालयात त्यांनी आतापर्यंत दोनदा आपली कैफियत मानली असून त्यावर उत्तर मिळाले नसल्याने ते आता हवाल दिल झालेले आहे तहसील कार्यालयाशी संपर्क केला असता असा काही अर्ज आला आहे का असे आम्हाला बघावा लागेल असे सांगण्यात आले त्यातच आज तहसील कार्यालयाला सुट्टी असल्याने प्रशासनाशी संपर्क होऊ शकला नाही

गीते यांनी अनेकदा तहसीलचे उंबरे झिजवले तरी त्यांना योग्य ते उत्तर मिळाले नसल्याने त्यांनी फोनची वाट ही बघितली पण फोन आलाच नाही

सिन्नरला तहसील कार्यालयात दोनदा चकरा मारल्या. अर्ज दाखल केलेला आहे. त्याची पोच माझ्याकडे आहे. शासनाच्या योजनेचा लाभ मिळाला नाही, यापेक्षा मला जिवंतपणी मृत दाखविले हा प्रकार गंभीर आहे. दोनदा पाठपुरावा करूनही अर्जाची दखल घेतली गेली नाही. फक्त तुम्हाला दोन दिवसांत फोन करतो एवढेच सांगण्यात आले, अशी कैफियत वृद्ध शेतकरी सुभाष गिते सकाळशी बोलताना सांगितले.

Subhash Kalu Gite
Pune Crime: शेतकऱ्याच्या मृत्यूप्रकरणी वीज कर्मचाऱ्यांवर गुन्हा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.