Diwali Faral: तयार फराळ विक्रीतून बाजारपेठेत चैतन्य! कसमादे पट्ट्यात दररोज लाखोंची उलाढाल

Diwali Faral
Diwali Faralesakal
Updated on

नामपूर : दिवाळी आणि फराळाचा अतूट संबंध असतो. गोरगरीबांपासून श्रीमंतांपर्यंत दिवाळीचे आकर्षण परंपरेने कायम आहे. घराघरांत दरवळणारा फराळाचा सुगंध आणि त्याचा खमंगपणा हा जरी परंपरेचा भाग आहे.

तरीदेखील बदलत्या जीवनशैलीत ग्रामीण भागातही महिलांकडून वेळेच्या कमतरतेमुळे रेडीमेड फराळालाच यंदा पसंती देण्यात आली.

यातून गेल्या आठ दिवसात लाखो रुपयांची दैनंदिन उलाढाल झाली आहे. घरगुतीपेक्षा रेडीमेड फराळाला यंदा वाढलेली मागणीमुळे हा आता घरगुती व्यवसाय म्हणून रुजू पाहत आहे. (Liveliness in market through sale of ready made faral daily turnover of lakhs in Kasmade belt in diwali festival nashik)

मोसम खोऱ्याची मध्यवर्ती बाजारपेठ म्हणून नामपूरची जिल्ह्याला ओळख आहे. परिसरातील ३० ते ३५ खेड्याचा सहवास लाभल्याने येथील बाजारपेठ दिवाळीसाठी सजली होती.

दुष्काळी परिस्थिती असली तरी अंतिम टप्प्यात कांद्याला मिळालेला सर्वोच्च भाव, कांदा अनुदान आदी बाबींमुळे शेतकरी समाधानी असल्याने दिवाळीचा गोडवा वाढला आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर रेडीमेड कापड व्यावसायिक, सराफी पेढ्या, कापडविक्रेते आदींचाही चांगला व्यवसाय झाला.

शहरातील नोकरदार कुटुंबांना इच्छा असूनही दिवाळीचा फराळ बनविण्यास वेळ मिळत नाही. यावर उपाय म्हणून रेडीमेड फराळाची खरेदीलाच प्राधान्य देण्यात आले. घरी फराळ बनविण्याची परंपरा असली तरी वेळेअभावी ग्राहकांचा रेडीमेड फराळाकडे कल वाढला आहे.

काही दिवसात खाद्यतेल, शेंगदाणे, खोबरे, साखर, बेसन, डाळी, व्यावसायिक गॅस यांच्या भाववाढीमुळे फराळांच्या पदार्थामध्येही भाववाढ झालेली आहे.

Diwali Faral
Diwali Faral : काय राव...फराळही खातंय भाव!

चिवडा, बेसन लाडू, रवा लाडू, शेव, करंजी, शंकरपाळे, चकली, अनारसे, लाडू, बुंदी लाडू, अनारसे, मिक्स मिठाई, बालुशाही, चना डाळ, मूगडाळ अशा एकाहून एक सरस पदार्थांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ उजळून निघाली होती.

आदर्श चौक, मध्यवर्ती बसस्थानक, पेट्रोल पंप, शिवछत्रपती नगर आदी भागांमध्ये रेडिमेड फराळाचे स्टॉल लावण्यात आले होते.

"दिवाळी सणाचा आनंद घेण्यासाठी वेळ असणे गरजेचे आहे. दिवाळीमध्ये घरातील सर्वांनाच सुट्टी असते. सर्वांनाच कुटुंबीयांसोबत वेळ घालविता यावा यासाठी रेडिमेड फराळ खरेदी करण्यास प्राधान्य दिले."-मनीषा पगार, सभापती नामपूर बाजार समिती

"घरामध्ये फराळ करण्याचे काम करणे महिलांना रोजच्या धावपळीतून शक्य होत नाही. फराळाचे साहित्य घेणे, त्यानंतर फराळ तयार करणे, यासाठी जेवढा वेळ जातो, त्याऐवजी रेडिमेड फराळ घेणे परवडते, म्हणून यंदा त्यालाच प्राधान्य दिले."

-डॉ. सुलभा पवार, सई बालरुग्णालय, सटाणा

"दिवाळी फराळातील विविध प्रकारचे पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध होते. शहर व परिसरातून यंदा फराळ खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला."

- सागर कंकरेज, संचालक भाग्यलक्ष्मी केटरर्स, नामपूर.

Diwali Faral
Diwali Faral : फराळ खाताय ,मग वेळ पाळायलाच हवी!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()