Nashik News : सभासदांना कर्जाची मर्यादा २५ लाख करत सहा टक्के लाभांश आणि नांदगाव व देवळा येथे संस्थेच्या नवीन शाखा सुरू करण्याचे ठराव नाशिक डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर्स अँड नॉन टीचिंग एम्प्लॉईज को- आप क्रेडिट सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आज घेण्यात आला. (Loan limit by NDST now 25 lakhs 6 percent dividend will be paid Nashik News)
सोसायटीचे अध्यक्ष अरुण पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत व्याजदर, लाभांश आणि सभासद कल्याण निधी विषयांवर किरकोळ वाद झाले. कर्जाचा व्याजदर सात टक्क्यांपेक्षा कमी करण्याची मागणी मात्र संचालक मंडळाने फेटाळून लावली. मानधनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नियमित करण्याबाबत सहानुभूतीने विचार करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सर्वसाधारण सभेतील इतिवृत्त कायम करणे, आर्थिक ताळेबंदास मंजुरी, विविध कामकाज, वैधानिक लेखापरीक्षण, नाममात्र सभासद करणे, पोटनियम दुरुस्तीबाबत विचार करणे, ठेवींवर व्यवस्थापन समितीने दिलेल्या व्याजास मंजुरी देणे आदी विषयांसह सटाणा, चांदवड व दिंडोरी येथे शाखेसाठी स्वमालकीची इमारत घेणे हे ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. सुरगाणा येथे संस्थेच्या कामकाजासाठी तात्पुरती व्यवस्था करण्याचा देखील निर्णय घेण्यात आला.
अध्यक्ष पवार म्हणाले,‘ सभासद पाल्यांना शैक्षणिक कर्ज देण्याच्या निर्णयाबाबत गंभीरपणे विचार सुरू आहे. त्यासह इतर काही बाबींसाठी जिल्हा उपनिबंधकांकडे अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे.
गत आर्थिक वर्षात नऊ कोटी ७६ लाख ५० हजार ४१६ रुपयाचा विक्रमी नफा झाला आहे. भाग भांडवल १३९ कोटी पेक्षा जास्त आहे. संस्थेत सभासदांच्या ठेवी २१३ कोटी असून नाममात्र सभासद ठेवी ५४ कोटी पेक्षा जास्त आहेत. गत वर्षी ४४५ कोटीचे कर्जवाटप केले आहे.
मेंबर वेल्फेअर स्कीम मधून प्रत्येक सभासदाचा २५ लाख रुपयाचा अपघात विमा काढला आहे. एखाद्या सभासदाचे निधन झाल्यास त्या सभासदाचे २० लाख ५० हजार कर्ज माफ करून त्याच्या कुटुंबाला १० हजार रुपये मदत दिली जाते.
ही मदत तीन लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचा संस्थेचा मानस आहे. संस्था सभासदांच्या मुलींच्या विवाहासाठी ११ हजार रुपये कन्यादान म्हणून देत असते.
वर्टी कॉलनी येथील संस्थेच्या मुख्य इमारतीशेजारी असणारा भूखंड विकत घेऊन तेथे सभासदांच्या मुलींसाठी वसतिगृह बांधणे अथवा इतर योग्य कामासाठी उपयोग करण्याचा ठराव देखील मंजूर करण्यात आला.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
कार्यवाह दीपक ह्याळीज यांनी इतिवृत्ताचे वाचन केले. साहेबराव कुटे, साहेबराव अहिरे, दिनेश अहिरे, शांतीलिंग तांदळे, उमेश महाजन, नीलेश देवरे, नीलेश ठाकूर, एस. के. सावंत, राजेंद्र शेळके, दत्तात्रेय आदिक, जयवंत भाबड आदींनी चर्चेत भाग घेतला. संस्थेचे सभासद आणि सटाणा नगरपालिकेचे गटनेता महेश देवरे यांनी संस्थेच्या सटाणा येथील इमारतीसाठी नगरपरिषदेच्या भूखंडातून मोफत भूखंड मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
संस्थेचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर ठाकरे, संचालक मोहन चकोर, बाळासाहेब ढोबळे, संजय देसले, दत्तात्रय आदिक, शांताराम देवरे, संजय पाटील, संजय वाघ, अनिल देवरे, विलास जाधव, निंबा कापडणीस, मंगेश सूर्यवंशी, समीर जाधव, सचिन पगार, गंगाधर पवार, अशोक बागुल, संग्राम करंजकर, श्रीमती विजया पाटील, श्रीमती भारती पाटील, भाऊसाहेब शिरसाट, चंद्रशेखर सावंत, भास्कर भगरे आदी उपस्थित होते.
केवळ दोनच महिला उपस्थित
संस्थेच्या सुमारे दहा हजार सभासदांपैकी किमान साडेतीन हजार महिला सभासद आहेत. मात्र वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी दोन महिला संचालिका वगळता एकही महिला सभासद उपस्थित राहत नाही.
त्यांनादेखील सभेसाठी उपस्थित राहता यावे यासाठी संचालक मंडळाने जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत अशी अपेक्षा संस्थेचे सभासद साहेबराव अहिरे, बाबासाहेब खरोटे, प्रवीण पाटील, देविदास कुवर, एस. एन. पाटील, उत्तम साबळे आदींनी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.