Labor Federation Election : स्थानिक नेते एकत्र येऊनही भुजबळच बाजीगर! दिलीप खैरे ठरले मास्टर माईंड

Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbalesakal
Updated on

येवला (जि. नाशिक) : स्थानिक प्रमुख नेत्यांनी एकोप्याची मोट बांधून माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासमोर तगडे आव्हान उभे करूनही बेरजेच्या राजकारणात भुजबळांनीच बाजी मारल्याचे दिसून आले आहे. जिल्हा मजूर संस्थांच्या सहकारी संघाच्या निवडणुकीत येथील जागेवर भुजबळ समर्थक सविता धनवटे यांचा एकतर्फी विजय झाला आहे.

स्थानिक नेत्यांची एकजूट दिसली पण कागदावर न आल्याने पुन्हा एकदा भुजबळच बाजीगर ठरले आहे. निवडणुकीची सूत्रे हलविणारे दिलीप खैरे या राजकीय घडामोडींत मास्टर माईंड ठरले आहे. (Local leaders come together but Bhujbal wins Dilip Khaire became mastermind Labor Federation Election)

ठेकेदारांना कामे वाटपाच्या प्रक्रियेत मजूर फेडरेशनचा सिंहाचा वाटा असतो. त्यामुळे साहजिकच संचालकांनाही लाखमोलाची किंमत असल्याने ही निवडणूक राजकीयदृष्ट्या स्थानिक नेत्यांसाठी वर्चस्वाची लढाई ठरते. त्यातच येथे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ विरुद्ध स्थानिक नेते असा सामना रंगत असल्याने जिल्ह्याचे लक्ष लागते. या वेळीही असेच चित्र दिसले. उमेदवार सविता धनवटे विरुद्ध मंदा बोडके असल्या तरी खरी लढत भुजबळ विरुद्ध दराडे-शिंदे-पवार अशीच रंगली होती. यामुळेच जिल्ह्याचे लक्ष येथील निकालाकडे लागले होते.

विद्यमान संचालक संभाजी पवार यांनी माघारीच्या दिवशी अर्ज मागे घेतल्याने राजकीय पेच वाढला होता. यामुळे दिलीप खैरे यांचे मावस बंधू असलेले भाऊसाहेब धनवटे यांच्या पत्नी सविता यांची बिनविरोध निवड होणार का? अशी शक्यता माघारीच्या दिवशी बळावली होती. मात्र आमदार किशोर दराडे, ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे तसेच माजी सभापती संभाजी पवार या तिघांनी एकत्रित येत उमेदवार देण्याचा निर्णय घेतल्याने चुरस वाढली होती.

Chhagan Bhujbal
Nashik Crime News : वादग्रस्त क्रशरचालकाला साडेतीन कोटींचा दंड!

दोन दिवसात फिरली सूत्रे

भुजबळ समर्थक सविता धनवटे विरुद्ध दराडे समर्थक मंदा बोडके असा सरळ सामना या निवडणुकीत तालुका जागेसाठी रंगला होता. दराडे-शिंदे-पवार यांनी पहिल्या टप्प्यात प्रभावी जुळवाजुळव केली. ८९ पैकी पवार-दराडे-शिंदे समर्थक ५८ ते ६० मतदार उपस्थित असल्याने बोडके यांचा विजय सुकर मानला जात होता. शेवटच्या दोन दिवसापर्यंत दराडे, शिंदे, पवार गटाचाच विजय होणार असेच सर्व वातावरण दिसत होते. त्यातच

भुजबळ गटाने जोरदार तयारी चालविल्याने निवडणुकीची रंगत अधिकच वाढली होती. नेत्यांच्या त्रिकुटाने उभा केलेला बुरूज ढासळण्यासाठी भुजबळांच्या यंत्रणेतून फिल्डिंग लावण्याचे काम सुरू होते. विशेष म्हणजे स्वतः भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ हे फक्त आढावा घेत होते. प्रत्यक्षात भुजबळांचे एकनिष्ठ समर्थक दिलीप खैरे यांनी येवल्यात तळ ठोकलाच.

शिवाय येथील संपर्क कार्यालयाचे बाळासाहेब लोखंडे, वसंत पवार,गोरख शिंदे तसेच सहकार नेते अंबादास बनकर आदी पदाधिकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी मतदारांना आपलेसे करण्यात यश मिळविले. अन एक-एक करत शेवटच्या दिवसापर्यंत मोठा गट हाती लावण्यात खैरे व सहकाऱ्यांना यश आल्याने मतदानाच्या दिवशी वेगळे चित्र दिसले.

हेही वाचा : जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'

Chhagan Bhujbal
Nashik News : नाशिक रोडला माजी नगरसेवकांच्या आशीर्वादाने लाकूडतोडे सक्रिय

यामुळे ६० चा आकडा सांगणाऱ्या नेत्यांच्या गटाला रविवारी सायंकाळीच मतदारांनी नाकारल्याचे लक्षात आले. मतमोजणी पूर्ण झाली अन ५४ मते मिळवून धनवटे यांनी २० मतांनी एकतर्फी विजय मिळविला.

पुढच्या राजकारणाकडे लक्ष

येथील राजकारणात पवार,शिंदे,दराडे व बनकर यांचे स्वतःचे वलय असून वर्चस्व देखील आहे. भुजबळ येथे आल्यापासून प्रत्येक वेळी कोणीतरी दोन नेते विरोधात राहिलेच आहे. मजूर फेडरेशनच्या निमित्ताने पुन्हा शिंदे, दराडे, पवार हे एकत्र आले होते. मात्र नेत्यांच्या या युतीला मतदारांनी नाकारले आहे.

आजचा निकाल नेत्यांच्या मनासारखा न आल्याने पुढे काय हा प्रश्न आहे. यामुळे आगामी बाजार समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुका हे त्रिकूट एकत्रच लढणार का ? याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असून आगामी घडामोडींकडे लक्ष लागले आहे

Chhagan Bhujbal
Nashik News : नव्या बेदाण्याची पिंपळगाव बाजार समितीत आवक; किलोला मिळाला 138 रुपये भाव!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.