नाशिक : 13 एकर गिळकृंत; अनधिकृत बांधकामाला स्थानिक नागरिकांचा आक्षेप

public objection
public objectionesakal
Updated on

नाशिक : दसक शिवारातील इनामी जमिनीचा घोटाळा (inami land scam) सहकाराच्या माध्यमातून बाहेर येत असताना सर्वसामान्यांचा आवाज बुलंद होताना दिसत आहे. त्याचाच एक भाग म्हणून विनयनगर येथे एका तेरा एकर भूखंडावर बिनशेती परवानगी न घेता तसेच ले-आउट मंजूर नसताना बांधकाम (Construction) सुरू असल्याच्या प्रकार विरोधात स्थानिक नागरिकांनी महापालिका आयुक्तांकडे (NMC Commissioner) धाव घेतली आहे. (Locals object to unauthorized construction on 13 acres in Vinaynagar Nashik News)

public objection
Nashik : 18 वर्षांपुढील 77 टक्‍के नागरिकांचे लसीकरण पूर्ण

नाशिक शिवारातील विनयनगर येथे सर्व्हे क्रमांक ८६६/१/१ मध्ये गेली काही महिन्यांपासून अनधिकृतपणे मोठ्या वसाहतीचे बांधकाम चालू आहे. सदर भूखंड कच्ची जमीन अर्थात बिनशेती न करता तसेच कुठल्याही ले- आउट मंजूर नसताना भूमाफियांकडून प्लॉट पाडून बेकायदेशीररीत्या विक्री करून गोरगरीब जनतेची फसवणूक केली जात आहे. इनामी प्रकारच्या या जागेवर पक्के बांधकाम चालू आहे. या संदर्भात महापालिकेने भूखंडावर चालू असलेली बांधकामांना नोटीस बजावण्यात आली आहे. तरी नोटिशीची दखल न घेता सर्रास बांधकाम चालू आहे, असे निवेदन महापालिका आयुक्त रमेश पवार यांच्यासह राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांना विनयनगर रहिवासी संघातर्फे देण्यात आले.

public objection
Nashik : आधी करोडोची माया घशात, नंतर शुल्क बुडवून शासनाला चुना

वारंवार पाठपुरावा करूनही कारवाई होत नसेल तर एक मोठी अनधिकृत वसाहत निर्माण झाली तर त्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाची राहील, असा इशारा नागरिकांनी दिला. विनयनगर रहिवासी संघाचे प्रवीण जाधव, अमित धामणे, संतोष रेवनडे आदींनी निवेदन दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()