Nashik Ozar Airport : शारजाह विमानतळ प्राधिकरणाच्या नकाशावर नाशिकला ‘न्यू एअर कार्गो डेस्टिनेशन’चे स्थान

nashik ozar airport
nashik ozar airportesakal
Updated on

Nashik Ozar Airport : शारजाह विमानतळ प्राधिकरणाने व्यावसायिक संबंधांना चालना देण्यासाठी आणि शारजा व यूएईच्या आर्थिक विस्ताराला हातभार लावण्यासाठी आपल्या विस्तार योजनांमध्ये नाशिकला नवीन हवाई कार्गो ‘डेस्टिनेशन’ म्हणून समाविष्ट केले.

प्राधिकरणाने अमेरिकेतील ह्यूस्टन, रवांडातील किगालीसह नाशिकचा नव्याने समावेश केला. त्यामुळे ओझरच्या (नाशिक) विमानतळावरून उद्योग, शेतमाल वाहतुकीसह आंतरराष्ट्रीय उड्डाणांची संधी चालून आली आहे. (Location of Nashik as New Air Cargo Destination on Sharjah Airport Authority map news)

ओझर विमानतळावरून ७२ आसन क्षमतेच्या विमानांच्या उड्डाणांना परवानगी आहे. मात्र, सध्या प्रवासी वाहतूक होते. एचएएल आणि कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडियातर्फे स्थापन करण्यात आलेल्या हॉलकॉन कंपनीने पूर्वी कार्गो सेवा सुरू केली. हॉलकॉनतर्फे येथे कार्गो सेवा पुरविण्यात येते. देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील ही सेवा आहे.

ओझरच्या विमानतळावरून यापूर्वी शारजाहमध्ये शेळ्या-मेंढ्या पाठविण्यात आल्या होत्या. आता शारजाह विमानतळ प्राधिकरणाच्या निर्णयामुळे नाशिकच्या विकासाला खऱ्या अर्थाने वेग येण्यास मदत होणार आहे. ओझरमधून आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणाचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्णत्वास जाण्यास मदत होईल, अशी नाशिककरांची अपेक्षा आहे.

शारजाह विमानतळाने २०२३ च्या पहिल्या सहामाहीत सात दशलक्ष प्रवाशांच्या वाहतुकीने २४.४ टक्के वाढ नोंदवली. काही वर्षांत प्रवासी हाताळण्याची क्षमता २० दशलक्षपर्यंत वाढविण्याच्या उद्देशाने विस्तारित प्रकल्पात काम करणाऱ्या विमानतळाने कार्गो सेवेत वाढ केली. विस्तारित प्रकल्प २०२६ पर्यंत पूर्णत्वास जाणे अपेक्षित आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

nashik ozar airport
Nashik Water Shortage : धरणांमध्ये यंदा अवघे 34 टक्केच पाणी; रिमझिम पावसामुळे धरणसाठ्यात अत्यल्प वाढ

विमानतळ प्राधिकरणाने सहा उड्डाण ठिकाणे आणि तीन एअर कार्गो ठिकाणे जोडण्याची घोषणा केली. नवीन उड्डाण ठिकाणांमध्ये मलेशियातील क्वालालंपूर, रशियामधील उफा आणि समारा शहर, इराणमधील लार, भारतातील इंदूर आणि थायलंडमधील बँकॉकचा समावेश आहे.

व्यावसायिक संबंधांना चालना देणे आणि शारजाह व यूएईच्या आर्थिक विस्तारात योगदान देणे तसेच शाश्वत वाढ, पायाभूत सुविधा आणि सेवा ‘ऑफर’ वाढवून जगाशी संबंध सुधारणे या प्राधिकरणाच्या उद्दिष्टाच्या अनुषंगाने हे पाऊल आहे, असे प्राधिकरणातर्फे स्पष्ट करण्यात आले.

शारजाह विमानसेवेचा विचार शक्य

शारजाह हे कार्गोचे हब आहे, असे सांगून हवाई वाहतूक तज्ज्ञ धैर्यशील वंडेकर म्हणाले, की कोरोनानंतर हवाई वाहतूक आणि लॉजिस्टिकला महत्त्व प्राप्त झाले आहे. अशावेळी ओझरच्या विमानतळावरील असलेल्या क्षमतांना शारजाह विमानतळ प्राधिकरणाने एक प्रकारची पावती दिली. प्राधिकरणाने कार्गो हवाई सेवेच्या नवीन ठिकाणात ओझरचा (नाशिक) समावेश केल्याने कदाचित, प्राधिकरणाचा कार्गो विमानसेवा सुरू करण्याचा उद्देश असू शकतो.

nashik ozar airport
Nashik Aditya Thackeray : आदित्य ठाकरे 22 पासून जिल्हा दौऱ्यावर

नाशिककरांसह इतरांचा फायदा

० औद्योगिक मालासह फलोत्पादन क्षेत्र, वाइन, कृषी प्रक्रियायुक्त आणि नाशवंत मालाची थेट जगभरात निर्यातीसाठी वाहतूक शक्य

० मुंबईसह इतर विमानतळांवरील वाहतूक समस्येवर निघेल उत्तर

० ओझरमधील ‘नाईट लँडिंग’ला मिळेल अधिकची गती

० रस्ते आणि रेल्वे वाहतुकीतून होणारा विलंबाचा प्रश्‍न निकाली निघेल

"शारजाह विमानतळ प्राधिकरणाने दिलेल्या संधीला प्रतिसाद म्हणून नाशिक ते शारजाह प्रवासी विमानसेवा सुरू करावी, अशी विनंती केंद्रीय हवाई नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना केली जाणार आहे.

भले मग ही प्रवासी वाहतूक विमानसेवा आठवड्यातून दोन ते तीन दिवस पहिल्यांदा सुरू केली तरी चालेल. त्यातून आंतरराष्ट्रीय ‘कनेक्टिव्हीटी’ला सुरवात होईल. शिवाय, अरब राष्ट्रातून साईभक्त शिर्डीला येण्यास मदत होईल." - धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूक तज्ज्ञ

nashik ozar airport
Nashik Rain Alert : जिल्ह्यातील घाट विभागामध्ये आज अन उद्या जोरदार पावसाचा अंदाज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.