Loksabha Election: शिंदे गट झाला सक्रिय; भाऊसाहेब चौधरी यांच्याकडे पुन्हा नाशिक संपर्कनेतेपदाची जबाबदारी

Loksabha Election: शिंदे गट झाला सक्रिय; भाऊसाहेब चौधरी यांच्याकडे पुन्हा नाशिक संपर्कनेतेपदाची जबाबदारी
Updated on

Loksabha Election: पाच राज्यांतील निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या यशानंतर आता लोकसभेच्या तयारीला सर्वच पक्षांनी प्राधान्य दिले आहे.

त्यात नाशिकची जागा कोणाला सोडायची, यावरून महायुतीत खो-खो सुरू असतानाच शिंदे गटाने लोकसभा निवडणुकीसाठी संपर्क नेत्यांची यादी जाहीर केली आहे. (Lok Sabha Election shiv sena shinde group Bhausaheb Chaudhari has responsibility of Nashik contact leader news)

त्यात भाऊसाहेब चौधरी यांच्याकडे पुन्हा नाशिकची जबाबदारी देण्यात आली. निरीक्षकपदाची जबाबदारी जयंत साठे यांच्याकडे देण्यात आली. दिंडोरीच्या निरीक्षकपदी सुनील पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.

गेल्या आठवड्यात राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, मिझोराम या पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळविले. लोकसभेची सेमी फायनल समजल्या जाणाऱ्या या निवडणुकीत भाजप कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचे मनोबल वाढले. त्यामुळे आता लोकसभेकडे लक्ष लागले आहे.

राज्यात भाजपची ताकद वाढविण्यासाठी लोकसभेच्या ४८ पैकी अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भाजपच्या या रणनीतीला उत्तर देण्यासाठी शिंदे गटानेही आता लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.

Loksabha Election: शिंदे गट झाला सक्रिय; भाऊसाहेब चौधरी यांच्याकडे पुन्हा नाशिक संपर्कनेतेपदाची जबाबदारी
Loksabha Election : लोकसभेचे दोन्ही मतदारसंघ राखण्याचे भाजपपुढे आव्हान

त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील ४८ जागांपैकी ३९ जागांवर निरीक्षक नियुक्त केले. त्यात नाशिकची जबाबदारी जयंत साठे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात सध्या शिंदे गटाचे, तर दिंडोरीत भाजपचे खासदार आहेत.

चौधरींकडे नाशिकसह उत्तर महाराष्ट्र

भाऊसाहेब चौधरी यांना नाशिक जिल्ह्याची संपूर्ण माहिती आहे. त्यामुळे नाशिकच्या संपर्कनेतेपदी पुन्हा चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली. ते पक्षाचे सचिव म्हणूनही जबाबदारी पार पाडत आहेत. चौधरी यांच्याकडे नाशिकसह जळगाव, धुळे, नंदुरबार, अहमदनगर जिल्ह्यांतील संघटनेच्या विस्ताराची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

"लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी राज्यात जबाबदाऱ्यांचे वाटप केले आहे. राज्यात पक्ष संघटना वाढीसाठी विविध उपक्रम राबविले जातील." - भाऊसाहेब चौधरी, संपर्क नेता, शिंदे गट

Loksabha Election: शिंदे गट झाला सक्रिय; भाऊसाहेब चौधरी यांच्याकडे पुन्हा नाशिक संपर्कनेतेपदाची जबाबदारी
Loksabha Election: लोकसभेला भाजप 400 हून अधिक जागा जिंकेल! भाजपच्या वरिष्ठ नेत्याचा मोठा दावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.