National Youth Festival : ‘लाल’रंगापेक्षा सप्तरंगांनी नटलेले काश्मीर बघा; राष्ट्रीय युवा महोत्सव

जम्मू-काश्मीरचे नाव ऐकले, की आपल्या डोळ्यासमोर लगेच दहशतवादी कारवायांचे चित्र उभे राहते.
An attractive picture drawn by Mehran Dussar, a painter from Jammu and Kashmir participating in the National Youth Festival.
An attractive picture drawn by Mehran Dussar, a painter from Jammu and Kashmir participating in the National Youth Festival.esakal
Updated on

किरण कवडे ः सकाळ वृत्तसेवा

National Youth Festival : जम्मू-काश्मीरचे नाव ऐकले, की आपल्या डोळ्यासमोर लगेच दहशतवादी कारवायांचे चित्र उभे राहते. सततच्या चकमकींमुळे या राज्याच्या सीमा ‘लाल’ रंगाने माखलेल्या असल्या तरी जम्मू-काश्मीरची निसर्गसंपदा, लोकांची संस्कृती याकडे सर्वसामान्य लोक दुर्लक्ष करतात.

ज्या पद्धतीने आमच्या राज्याची प्रतिमा देशभर पसरली आहे, तसे वास्तव येथे नाही. (Look at Kashmir with seven colors rather than red color in national youth festival nashik news)

येथील निसर्गसौंदर्य जगभरातील लोकांना मोहिनी घालणारे असून, केवळ ‘लाल’ रंगाने आमच्‍याकडे न बघता निसर्गाच्‍या सप्‍तरंगांनी आमचे राज्‍य कसे न्‍हाऊन निघाले आहे, हे बघण्‍यासाठी जम्‍मू-काश्मीरला भेट देण्‍याचे आवाहन येथील युवा चित्रकार मेहरान दुसार याने केले. राष्ट्रीय युवा महोत्सवात उदोजी महाराज म्युझियममध्ये सहभागी या युवा कलाकाराने आपल्या कुंचल्यातून राज्याचे सुंदर चित्र रेखाटले आहे.

काश्मीर व्हॅलीमधील अनंतनाग भागात जी. डी. सी. बॉईज महाविद्यालयात कला शाखेतून पदवीच्या तिसऱ्या वर्षात मेहरान शकतो. चित्रकार म्हणून करिअरचे स्वप्न बघणाऱ्या मेहरानने येथील बर्फाळ प्रदेश, उंचच उंच झाडे आणि यातून नागमोडी वळणाने वाहणाऱ्या नदीचे काढलेले सुंदर चित्र सर्वांना मोहित करते. याविषयी मेहरान सांगतो, चित्रांनी आपले आयुष्य रंगीत केले. चित्रकारांना कुठल्याही सीमा नसतात.

An attractive picture drawn by Mehran Dussar, a painter from Jammu and Kashmir participating in the National Youth Festival.
National Youth Festival : मोदींच्या सभेसाठी जर्मन तंत्रज्ञानावर आधारित डोम; राष्ट्रीय युवा संमेलन तयारी

जम्मू-काश्मिरकडे फक्त लष्करी कारवायांच्या अंगाने बघितले जाते. त्याविषयी भरभरून चर्चा होते आणि आमच्याकडे त्याच सहानुभूतीने विचारणा केली जाते. पण फक्त कारवायाच नाही तर आमचा प्रदेश निसर्गाने संपन्न आहे. त्यादृष्टीने आमची ओळख व्हायला हवी, यादृष्टीने एक कलाकार म्हणून आपल्या सृष्टीचे रंग ‘पोस्टर’वर उतरवण्याचा प्रयत्न करत आहे.

किमान यातून महाराष्ट्रातील कलाकारांचा दृष्टिकोन बदलला तरी माझ्यादृष्टीने युवा महोत्सवात सहभागी झाल्याचे समाधान लाभले, असे मेहरान सांगतो. युवा महोत्सवाच्या माध्यमातून वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या युवकांची संस्कृती जाणून घेत आहे. आशा वाटते की एक दिवस लोक आम्हाला आणि आमच्या संस्कृतीलाही समजून घेतील, असे मेहरान सांगतो आणि चित्र रेखाटण्यात स्वत:ला गुंतवून घेतो.

महाराष्ट्राला कलेविषयी आदर

महाराष्ट्रातील लोकांना कला आणि कलाकारांविषयी नितांत आदर दिसून येतो. त्यामुळे बहुतेक लोक याठिकाणी आमच्या चित्रांना दाद देतात. प्रेक्षकांची मिळणारी दाद एक कलाकार म्हणून ऊर्जा देणारी असते. उदोजी महाराज म्युझियममध्ये येऊन आनंद झाल्याचे मेहरान आवर्जून सांगतो.

An attractive picture drawn by Mehran Dussar, a painter from Jammu and Kashmir participating in the National Youth Festival.
National Youth Festival : लोकनृत्यातून देशातील विविधतेचे दर्शन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()