Water Conference: युक्ती शोधत जगाला करू दुष्काळ अन पूरमुक्त! न्यूयॉर्कमधील पहिल्या जागतिक जल परिषदेत निर्धार

Dr. Rajendra Singh
Dr. Rajendra Singhesakal
Updated on

World Water Conference : दुष्काळ -पूर जागतिक लोक आयोगाच्या पहिल्या जागतिक जल परिषदेत युक्ती शोधत जगाला दुष्काळ अन पूरमुक्त करण्याचा निर्धार करण्यात आला. त्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ आणि जगातील सर्व सरकारे आणि जागतिक बँकेसारख्या सर्व आंतरराष्ट्रीय संस्थांचे सहकार्य घेतले जाईल.

याच परिषदेत दहा ठराव करण्यात आले आहेत, अशी माहिती आयोगाचे अध्यक्ष तथा आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी दिली. (Looking for trick to make world drought and flood free Decisions at first World Water Conference in New York nashik news)

आपल्या आयुष्यात पाण्याचे चक्र खंडित झाले आहे. त्यामुळे पाण्याचे पुनरुत्पादन हाच आमचा उपाय आहे, असे सांगून डॉ. सिंह म्हणाले, की केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि देशातील तीस सदस्यांचे शिष्टमंडळ केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून परिषदेत सहभागी झाले होते.

आफ्रिका आणि सर्व उपखंडांचे प्रतिनिधी परिषदेसाठी उपस्थित होते. भारत नद्यांना माता मानतो. भारतीयांनी नद्यांना मानवाचा दर्जा दिला आहे. गेल्या चार दशकात १३ नद्यांचे पुनरुज्जीवन झाले आहे. १९७७ मध्ये पहिली जागतिक जलपरिषद झाली होती. ४६ वर्षानंतर ही दुसरी आणि आयोगाची पहिली जल परिषद संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयात झाली.

समानता आणि साधेपणा ही नवनिर्मितीची मूलभूत तत्त्वे आहेत. याचअनुषंगाने परिषदेत दहा ठराव करण्यात आले. या ठरावांची माहिती डॉ. सिंह यांनी दिली. ते म्हणाले, की जलचक्राच्या मानव -केंद्रित संकुचित आकलना पलिकडे, व्यापक मानव आणि निसर्ग -केंद्रित संकल्पनांच्या आकलनाकडे वाटचाल करावी लागेल.

समाजाची ज्ञान प्रणाली आणि आधुनिक विज्ञान, कला आणि तंत्रज्ञानाच्या सर्वांगीण आकलनावर आधारित विकसित ज्ञान आणि शिक्षणाचा वापर करावा लागेल. मानवता आणि निसर्ग यांच्यातील परस्परसंबंधांची समज देणारी शिक्षण प्रणाली, जी तरुणांना पृथ्वीच्या पुनरुत्पादनासाठी कार्य करण्यास प्रेरित करेल.

तसेच पाण्याचा दुरुपयोग रोखून विवेकपूर्ण विश्वस्ताची भूमिका बजावून पाण्याचा काटकसरीने वापर करण्यात येईल. शिवाय पाण्याच्या व्यापारीकरणाला विरोध करून आम्ही जलसमाज स्थापन करणार आहोत. इथे समुदाय म्हणजे सर्व प्राण्यांचा समुदाय अभिप्रेत असेल.

निष्काळजीपणा आणि उदासीनतेच्या पलीकडे जाऊन जलचक्राच्या पुनर्निर्मितीसाठी आम्ही संघटित आणि कार्य करणार आहोत. प्रत्येक जलाशय, जलस्रोत आणि नदी प्रणाली ही जैवविविधतेने भरलेली एक अद्वितीय परिसंस्था आहे. हे लक्षात घेऊन आम्ही जलाशयांशी व्यवहार करणार आहोत.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Dr. Rajendra Singh
Uddhav Thackeray Group : पंचवटीतील 100 तरुणांचा ठाकरे गटात प्रवेश; शालिमार कार्यालयात प्रवेश सोहळा

त्याचवेळी भावी पिढ्या डोळ्यांसमोर ठेवून अल्पकालीन ते आयुष्यभर वचनबद्धतेपर्यंत पाण्याच्या वापरात विश्वासूची भूमिका बजावणार आहोत. पाणी हे जीवन आहे, पाणी हा जीवनाचा आधार आहे, ती केवळ आर्थिक मूल्याची गोष्ट नाही.

नद्या, जलप्रवाह आणि सर्व सजीवांना अखंडपणे, स्वच्छ आणि मुक्तपणे, विश्वाचे पोषण करण्याचा अधिकार आहे. जल परिषदेतील ठराव संयुक्त राष्ट्रांना इंग्रजीमधून देण्यात आले आहेत.

‘चला जाणूया नदीला' उपक्रम चर्चेत

महाराष्ट्रातील ‘चला जाणूया नदीला' हा कार्यक्रम चर्चेत राहिला. जलबिरादरीचे अध्यक्ष नरेंद्र चुघ आणि इतरांनी परिषदेत कार्यक्रमाची माहिती दिली. समाज आणि सरकारचा हा संयुक्त उपक्रम आहे. त्याचे परिणाम आता महाराष्ट्रातील नद्या आणि जमिनीवर दिसू लागले आहेत.

नद्यांच्या बाबतीत भारत जागृत झाला असून तेलंगणामधील गोदावरी नदी निर्मल वाहत राहण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती व्ही. प्रकाश राव यांनी दिली, असेही डॉ. सिंह यांनी सांगितले.

Dr. Rajendra Singh
Market Committee Election : ZPचे माजी सदस्य बाजार समितीच्या रिंगणात; निवडणुका लांबल्याचा परिणाम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()