Nashik News: यंत्रमाग व्यवसाय मंदीच्या कचाट्यात! मजुरांना आठवड्यातून तीनच दिवस मिळतेय काम

power loom industry
power loom industryesakal
Updated on

मालेगाव : शहराची अर्थव्यवस्था यंत्रमागावर अवलंबून आहे. मात्र चार महिन्यापासून शहरातील यंत्रमाग व्यवसायात खडखडाट असल्याने येथे मंदीचे सावट आहे.

याचा परिणाम यंत्रमाग कामगारांवर झाला असून मजुरांना आठवड्यातून तीनच दिवस काम मिळत आहे. (loom business in throes of recession Laborers getting work only three days week Nashik News)

शहरात अडीच ते तीन लाख यंत्रमाग आहेत. येथे रोज लाखो मीटर कापड तयार होते. यात कापडामध्ये पीसी, कॉटन, पॉपलीन, केंब्रीज, रोटो हे कापड तयार होतात. या कापडापासून पेटीकोट, घागरा तयार होता.

केंब्रीजपासून ओढणी, दुपट्टा, साडी तयार केली जाते. येथील कापडाला घाऊक बाजारात सहा ते ३६ रुपये मीटरपर्यंत भाव मिळत आहे. मात्र मंदीमुळे यातील हजारो यंत्रमाग आठवड्यात तीन दिवसच सुरु आहे.

गेल्या चार महिन्यापासून अशीच परिस्थिती असून हे चक्र दिवाळी सणात दूर होईल असे वाटत होते. मात्र दुष्काळी परिस्थितीचा फटका कापड उद्योगाला देखील बसला आहे.

शासनाने व्यवसायाच्या समस्या सोडवून यंत्रमागधारक व कामगारांना दिलासा द्यावा अशी मागणी कारखानदार व यंत्रमाग समितीतर्फे करण्यात आली आहे.

राज्यातील भिवंडी, इचलकरंजी, सोलापूर येथील यंत्रमाग व्यवसाय देखील अडचणीत आहेत. राज्यभरात महिन्याकाठी १५ ते २० दिवस कारखाने चालतात. एकूणच मंदीमुळे यंत्रमाग व्यवसाय अडचणीत आला आहे.

राज्य शासनाने दखल घेऊन लाखो यंत्रमागधारक व कामगारांना दिलासा देण्याची मागणी यंत्रमागधारकांकडून केली जात आहे.

कापडाची मागणी कमी

देशांतर्गत बाजारात कापडाला उठाव कमी आहे. महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये असलेली दुष्काळी परिस्थिती हे मुख्य कारण मानले जाते. शहरात यंत्रमाग मोठ्या प्रमाणावर असले तरी येथे प्रक्रिया उद्योग नाहीत.

power loom industry
Nashik: यंत्रमाग व्यवसायाला मिळणार बूस्टर डोस! जिल्ह्यात पावणेदोन लाख कुटुंबांना मिळणार साडीचा लाभ; जाणून घ्या सविस्तर

येथे तयार झालेले कापड प्रक्रियेसाठी अहमदाबाद, सुरत, डोंबिवली, पाली, बालोत्रा येथे पाठविले जाते. परिणामी येथील कापडाचा उत्पादन खर्च वाढतो. अशा परिस्थितीत मालेगावच्या कापडाला इतर ठिकाणच्या कापडाशी बाजारपेठेत स्पर्धा करावी लागते.

राजस्थान येथे यंत्रमागावरील प्रक्रिया उद्योग मुबलक प्रमाणात आहे. राजस्थान निवडणूक व दिवाळी सणानिमित्त अनेक प्रक्रिया उद्योग पुरेशा प्रमाणात सुरु नाहीत. त्याचा देखील परिणाम झाला आहे.

यंत्रमाग व्यवसाय मुख्य कणा

येथील नागरिकांचा यंत्रमाग व्यवसाय हा मुख्य कणा आहे. यंत्रमागावर मंदी आल्यावर येथील सर्वच व्यवसायाला घरघर लागते. सध्या येथील ७० टक्के यंत्रमाग कारखाने आठवड्यातून तीन दिवस सुरू आहे.

एका यंत्रमागावर चोवीस तासात दोन ते तीन मजुरांना रोजगार मिळतो. यात यंत्रमाग चालक, मुकादम, तरासन, भीम भरणारे कामगार आदींचा समावेश आहे.

शहरासह ग्रामीण भागातील वडगाव, चंदनपुरी, दसाने, सायने, लेंडाणे, सवंदगाव, म्हाळदे, दरेगाव आदी गावातील मजूर येथील सायजिंगमध्ये काम करतात.

दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील मजुरांचा ओढा शहरी भागाकडे वळत आहे. येथील एका यंत्रमागावर २४ तासात ८० मीटर कापड तयार होते.

"राज्यात कर्नाटक, तामीळनाडू, बऱ्हाणपूर, उत्तरप्रदेश या राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात वीजेचे दर जास्त आहेत. येथे कारखानदारांना सरकारतर्फे एका यंत्रमागावर महिन्याला एक हजार रुपये वीजबील येते. तेच उत्तरप्रदेशमध्ये एका यंत्रमागाला महिन्याला ७५ रुपये प्रमाणे बील येते. शासनाने उत्तरप्रदेशच्या धर्तीवर येथेही ही योजना राबवावी. यंत्रमाग व्यवसायाचे प्रश्‍न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी उपाययोजना कराव्यात."

- युसूफ इलियास, अध्यक्ष, मालेगाव तालुका यंत्रमाग संघटन

power loom industry
Nashik News: मानोरी खुर्दला मंगळवारपासून शेतीमालाचा लिलाव! लासलगाव बाजार समितीचे सभापतींची माहिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()