ईदनंतर यंत्रमाग उद्योगावर संकटाचे सावट; कामगारांवर उपासमारीची शक्यता

देशात वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे अनेक भागात लॉकडाऊन व कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. या निर्बंधामुळे यंत्रमाग व्यवसाय अडचणीत येत आहे.
loom industry in Malegaon
loom industry in MalegaonGoogle
Updated on

मालेगाव (जि. नाशिक) : देशात वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे अनेक भागात लॉकडाऊन व कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. या निर्बंधामुळे यंत्रमाग व्यवसाय अडचणीत येत आहे. बाजारपेठा व दुकाने बंद असल्यामुळे कापडाला उठाव नाही. त्यातच पाली, बालोत्रा, अहमदाबाद आदी ठिकाणचे प्रक्रिया उद्योग कोरोनामुळे बंद पडू लागले आहेत. परिणामी रमजान ईदनंतर मालेगावसह राज्यातील इतर भागातील यंत्रमाग उद्योग अडचणीत येण्याची शक्यता आहे. (loom industry in Malegaon is in crisis due to restrictions imposed during the Corona period)

येथील यंत्रमाग उद्योग वर्षांपासून कोरोना संकटाचा मुकाबला करीत आहे. घडी बसण्याच्या आतच कोरोनाची दुसरी लाट आल्याने व्यवसायापुढे संकट उभे राहिले आहे. सध्या मुस्लिम बांधवांचे रमजान पर्व सुरू आहे. आठवड्यावर ईदचा सण आला आहे. मजुरांना सण साजरा करता यावा यासाठी यंत्रमाग जोमात सुरू आहेत. उत्पादन सुरू असले तरी मालाला पुरेसा उठाव नाही. उत्पादित केलेला माल गोदामात पडू लागला आहे.

कष्टकऱ्यांवर थेट परिणाम

राज्यातील भिवंडी, इचलकरंजी, सोलापूर आदी ठिकाणी स्थानिकांएवढेच बाहेरचे कामगार आहेत. राज्यात लॉकडाऊन जाहीर होण्यापूर्वीच पर राज्यातील मजदूर गावी निघून गेले. मालेगावात सर्व स्थानिक मजदूर आहेत. सुदैवाने मुस्लिम बहुल भागात कोरोना रुग्ण संख्या अल्पशी आहे. मालेगावात प्रक्रिया उद्योग नाही. येथील मालावर पाली, बालोत्रा आदी ठिकाणी प्रक्रिया केली जाते. प्रक्रिया उद्योगातील मजूर देखील कोरोनाच्या विळख्यात येत आहेत. त्यातच निर्बंध कडक होत असल्याने ईदनंतर प्रक्रिया उद्योगही काही काळ बंद राहू शकतील. आगामी आठवड्यापर्यंत रुग्णसंख्या आटोक्यात आली नाही तर ईदच्या सुट्टीनंतर यंत्रमागावरील संकट अधिक गडद होऊ शकेल. याचा फटका यंत्रमाग कामगारांना बसू शकतो. मालेगावात यंत्रमाग हाच मुख्य व्यवसाय आहे. यंत्रमागाचा खडखडाट मंदावल्यास सामान्यांसह झोपडपट्टीतील कष्टकऱ्यांवर त्याचा थेट परिणाम होतो. त्यामुळे येथे काहीशी चिंता व्यक्त केली जात आहे.

loom industry in Malegaon
वेस्‍ट नाही; पण कोरोनाचे लसीकरण बेस्‍टही नाहीच!

लॉकडाउनचा फटका…

महाराष्टासह देशात अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन व कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. बाजारपेठा, दुकाने व आठवडे बाजार बंद असल्याने कापड व्यवसायातील उलाढाल मंदावली आहे. मालेगावच्या कापडाला महाराष्ट्रासह कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, उत्तरप्रदेश, बिहार, ओडिसा, आसाम आदी भागात चांगली मागणी असते. नेमक्या ह्याच ठिकाणी लॉकडावूनमुळे बाजार बंद आहे. ऐन लग्नसराईत बाजारपेठा बंद असल्याने सलग दुसऱ्या वर्षी कापड उद्योग बॅकफूटवर गेला आहे. सध्याच्या परिस्थितीमुळे ५० टक्के देखील उत्पादित मालाची विक्री झाली नाही.

loom industry in Malegaon
शिवसेनेच्या नगरसेविका सत्यभामा गाडेकर यांचे कोरोनाने निधन

गोदामातील मालाच्या विक्रीसाठी बाजारपेठा व दुकाने सुरू होणे गरजेचे आहे. यावर्षी अनेक यंत्रमाग कारखाने १० ते १५ दिवस ईदची सुट्टी घेणार आहेत. बाजारपेठा व प्रक्रिया उद्योग बंद राहिल्यास ईदनंतर यंत्रमाग उद्योग अडचणीत येईल. शासनाने तात्काळ यंत्रमागधारकांचे तीन महिन्याचे वीजबिल माफ करावे. तसेच यंत्रमाग कामगारांना प्रत्येकी पाच हजार रुपये अर्थसहाय्य द्यावे.

- युसूफ इलियास, अध्यक्ष, मालेगाव पॉवरलूम ॲक्शन कमिटी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.