जुने नाशिक : पखालरोड येथील मंडप डेकोरेटरचे लाखोंचे भांडे संशयिताकडून लंपास करण्यात आले होते. भद्रकाली पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने २४ तासात घटनेचा सुगावा लावत मालेगाव येथून सर्व भांडे हस्तगत केले. शुक्रवारी (ता.३) भद्रकाली पोलिस ठाण्यात सायंकाळी गुन्हा दाखल झाला होता. (Looted utensils seized from Malegaon Suspect absconding Nashik Crime News)
पंजाब खुरला येथील संशयित विकासकुमार खन्ना याने रामतीर्थ परिसरात गुरुवारी (ता.२९) अन्नदान करावयाचे आहे. त्यासाठी लागणाऱ्या भांड्यांसंदर्भात त्याने बुधवारी (ता.२८) द्वारका, पखाल रोड येथील तक्रारदार मंडप डेकोरेटर मोबीन आत्तार यांची भेट घेतली. स्वतःची संपूर्ण ओळख सांगून त्यांचा विश्वास संपादन केला.
त्यानंतर भाडोत्री भांड्यांचे ठरलेल्या भाड्यातील ३ हजार ८०० रुपयांची अर्धी रक्कम श्री.आत्तार यांना दिली. १८ पातेले, १२ लोखंडी झाकण, ४ गॅस शेगड्या, ८ ट्रे असे सुमारे १ लाख ७८ हजारांचे भांडे गंजमाळ येथील रॉयल हेरिटेज हॉटेलमध्ये बुधवारी (ता.२८) सायंकाळपर्यंत पोहोचविण्यास सांगितले. श्री. आत्तार यांनी त्यांच्या रिक्षातून सर्व भांडे त्याठिकाणी पोहचविले. संशयिताने हॉटेल आवारात भांडे उतरवून घेतले.
गुरुवारी (ता.२९) सकाळी तक्रारदार भांडे घेण्यासाठी हॉटेलमध्ये पोहचले. संशयितांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. बाहेर असल्याचे सांगून त्याने मोबाईल कट केला. तक्रारदारांना संशय आल्याने त्यांनी हॉटेल मॅनेजरशी संपर्क करून विकासकुमार खन्ना बाबत माहिती घेतली. त्याने रात्रीच रिक्षात भांडे घेऊन निघून गेल्याची माहिती मॅनेजरने तक्रारदार यांना दिली. त्यांनी रामतीर्थ परिसर गाठत संशयिताचा शोध घेतला.
तो मिळून आला नाही. भांडे लंपास फसवणूक केल्याचे तक्रारदार यांची खात्री झाली. त्यांनी शुक्रवार(ता.३०) भद्रकाली पोलिसांशी संपर्क करून घडलेला प्रकार सांगत गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, कर्मचारी रमेश कोळी, सागर निकुंभ, धनंजय हासे, लक्ष्मण ठेपणे यांनी संशयिताचा शोध घेत होते.
संशयिताचे मोबाईल लोकेशनची माहिती घेतली असता पिंपळगाव, मालेगाव याठिकाणी लोकेशन आढळून आले. पथकाने पिंपळगाव टोलनाक्याचे सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. भांड्याने भरलेले वाहन मालेगावचे दिशेने गेल्याचे आढळून आले. त्यानुसार पथकाने मालेगाव येथून चोरी झालेले सर्व भांडे हस्तगत केले. संशयित मात्र फरारी होण्यास यशस्वी ठरला. पोलिस त्याचा शोध घेत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.