गळ्यातली पोत मोडून 'ती' हाकतेय संसाराचा गाडा

Loss in business due to corona
Loss in business due to coronaesakal
Updated on

पेठ (जि. नाशिक) : कोरोनामुळे (Corona) समाजाच्या अनेक घटकांना फटका बसला आहे. काहींची रोजीरोटीच यामुळे हिरावली गेली आहे. ग्रामीण जीवनातील अर्थकारणाचा कणा असलेला आठवडे बाजारही या काळात बंद असल्याने त्यावर पोट अवलंबून असलेल्या अनेकांपुढे दोन घास पोटात कसे टाकावेत याचा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. कटलरी व्यावसायिक तबस्सूम तांबोळी यांची कथाही काहीशी अशीच आहे.

गहू, तांदळाने दिवस निघत नाही...

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून करंजाळी, कोहोर, जोगमोडी, पेठ, चिकाडी, बाऱ्हे, येथील बाजारबंद आहे. ज्यांची पोटबाजार धंद्यावर आहेत, असे लहान व्यावसायिक कटलरी, भेळवाले, मिठाईवाले, विळे कोयतेवाले, फुगेवाले, पानतंबाखूवाले, भाजीपाला, कपडे विकणारे (कोंबठी) या व्यवसायाने मान टाकल्याने व्यावसायिक मेटाकुटीला आले आहेत. व्यापारी कर्ज, बॅकचे कर्ज यांच्या व्याजाचा बोजा वाढवत आहेत. जगण्यासाठी शासनाने मोफत गहू, तांदूळ वाटप केले पण त्यासाठी लागणारा किराणा आणि इतर खर्चासोबत आजारपणाचा सामना करताना जीव हैराण झाला. शासनाने मॉल, हॉटेल, बिअरबार, थिएटर, प्रवासी वाहतूक, गंगेवर भरणारा बाजार या व्यवसायांना सवलत देऊन चालू केले. मात्र आठवडे बाजार अजूनही बंदच आहेत. आमची उपासमार होऊ लागल्याने शासनाने बाजार सुरू करण्याबाबत विचार करावा असे श्रीमती तांबोळी यांनी सांगितले.

Loss in business due to corona
बोलाचा भात अन् बोलाचीच कढी.. राज्य सरकारचे पितळ उघडे!

आई जेवू घालिना, बाप भीक मागू देईना अशी अवस्था

लहान मुलगा तापाने फणफणला, तेव्हा हातात दमडी नव्हती. हात उसणवार द्यायला जवळची माणसं लांब जात होती. दहा वर्षाच्या कमाईने केलेली गळ्यातील सोन्याची पोत मोडून मुलाचा दवाखान्याचा खर्च भागविला. माझे पती राजू तांबोळी हे बाजारात अगरबत्तीचा तर मी प्लॅस्टिक वस्तू व खेळणी विक्री करून उदरनिर्वाह करतो. गेल्या दोन वर्षांपासून हातात दमडी नाही. गावखेड्यावर वाड्या वस्त्यांवर फेरी करून व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला असता गावातील प्रमुख हे शासन आदेश मागतात. आई जेवू घालिना, बाप भीक मागू देईना अशी या व्यवसायाची गत झाली आहे.

Loss in business due to corona
गरबा, दांडिया यंदाही नाहीच; व्यावसायिक, विक्रेत्यांना मोठा फटका

ज्या तालुक्यात कोरोनाचा प्रार्दुभाव नाही अशा भागात बाजार सुरू व्हावेत अशी या व्यावसायिकांची मागणी आहे.

''कोरोनाने आर्थिक खाईत ढकलले आहे, त्यातच बाजार बंदमुळे व्यवसाय तुटला. रुपया पृथ्वीसारखा मोठा वाटायला लागला. व्यापारी कर्ज व बॅकेंचे कर्ज कसे भरावे ही चिंता सतावत आहे. शासनाने इतर व्यवसाय सुरू करायला परवानगी दिली, तशी आठवडे बाजार सुरु करावेत, जेणेकरून आम्हाला जगता येईल. मायबाप सरकारने आमचा विचार करावा.'' - तबस्सूम तांबोळी, कटलरी व्यावसायिक, पेठ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.