महाराष्ट्राचे ‘भरतपूर' नांदुरमध्यमेश्वरला कमळांचा साज!

lotus in dam
lotus in damesakal
Updated on

लासलगाव (जि. नाशिक) : महाराष्ट्राचे ‘भरतपूर’ अशी ओळख असलेल्या आणि नुकताच राज्यातील पहिले ‘रामसर’ आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झालेल्या निफाड तालुक्यातील नांदूरमध्यमेश्‍वर अभयारण्याच्या पानथळामध्ये हजारो कमळांची फुले बहरली आहेत. जणू निसर्गाने पानथळाला कमळपुष्पांचा साज चढविला असून, जलाशयाला सौंदर्याचे कोंदण लाभले आहे. (lotus-blooms-in-nandurmadhyameshwar-Sanctuary-nashik-marathi-news)

पावसाळा सुरू झाला, की निसर्ग विविध रंग संगतीने बहरण्यास सुरवात करतो. त्यात निसर्गात उमलणाऱ्या विविध प्रजातींची फुले नेहमीच आकर्षित करतात. असाच एक कमळ पुष्पांचा बहर राज्यातील पहिले ‘रामसर’ आंतरराष्ट्रीय दर्जा मिळविणाऱ्या नांदूरमध्यमेश्‍वर वन्यजीव अभयारण्याच्या जलाशयात दिसत आहे. यंदा कमळाची अडीच एकरांवर हजारो कमळपुष्प फुलली आहेत. या सौंदर्यात भर घालण्यासाठी गोदावरीच्या अथांग पात्रातील लाल-पांढऱ्या फुलांवर पक्षी बसू लागल्याने येथील निसर्ग सौंदर्य आणखीच खुलून दिसू लागले आहे.

lotus in dam
नाशिक जिल्ह्यातील जमीन सुपीकतेत 15 वर्षात मोठा बदल!

२४० हून अधिक प्रकारचे पक्षी

नांदूरमध्यमेश्‍वर ‘पक्षीतीर्थ’ असलेल्या या अभयारण्यात करण्यात आलेल्या पक्षी निरीक्षणातून येथे २४० हून अधिक प्रकारचे पक्षी आढळून आले आहेत. येथील जलाशयात २४ जातीचे मासे आहेत. परिसरात ४०० हून अधिक प्रजातीच्या वनस्पतींची विविधता आहे. या परिसरात उदमांजर, कोल्हे, मुंगूस, लांडगे, बिबटे, विविध प्रकारचे साप दिसून येतात.

''गेल्या वर्षी कोरोनामुळे निसर्गप्रेमींना कमळपुष्पांचा आनंद घेता आला नाही. मात्र, यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने पक्षी अभयारण्य निसर्ग व पक्षीप्रेमींसाठी खुले करण्यात आले आहे. त्यामुळे अभयारण्य गर्दीने फुलून गेले आहे.'' - अशोक काळे, वनपरिक्षेत्र अधिकारी, नांदूरमध्यमेश्‍वर

lotus in dam
RTE प्रवेशप्रक्रियेपासून निम्‍मे विद्यार्थी दूरच

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()