नाशिक : फेब्रुवारीतील तरुणाईचा उत्सव असलेल्या व्हॅलेंटाइन डेनिमित्त गेल्या काही दिवसांपासून उत्साह बघायला मिळत होता. बुधवारी (ता. १४) प्रेमाला बहर येणार असून, तरुणाई सज्ज झालेली आहे.
आउटिंग, हॉटेलिंगसह इतर जय्यत नियोजन नियोजन आखण्यात आल्याचे बघायला मिळते आहे. (Love blossoms on Valentine Day 2024 Youth friendly hotels outings heavily planted nashik news)
व्हॅलेंटाइन डेनिमित्त सप्ताहात वेगवेगळे दिन साजरे करण्यात येत होते. यामुळे वातावरण निर्मिती होताना उत्साहदेखील वाढता होता. या दिवसाचे औचित्य साधत प्रेमाचे ऋणानुबंध अधिक घट्ट करण्यावर भर दिला जात होता.
उत्साह वाढविण्याच्या दृष्टीने शहरातील विविध कंपन्यांची दालने, हॉटेल्ससह भेटवस्तूच्या दुकानांची आकर्षक सजावट करण्यात आलेली होती. अगदी रोज डेपासून सुरु झालेला हा उत्साह आता शिगेला पोचला आहे.
बुधवारी (ता. १४) व्हॅलेंटाइन डे असल्याने पूर्वसंध्येला शहर परिसरात तरुणाईला बहर आला होता. कॉलेज रोड, गंगापूर रोडसह इतर विविध ठिकाणी युवकांची गर्दी बघायला मिळत होती. प्रेमीयुगुलांप्रमाणे मैत्रिणी, मित्र, नवदांपत्य यांच्यामध्येही व्हॅलेंटाइन डे साजरा करण्याविषयी ऊर्जा बघायला मिळाली.
हॉटेल व्यावसायिकांनी आकर्षक सजावट केल्याचे बघायला मिळाले. लाल व पांढऱ्या रंगाचे फुग्यांसह विद्युत रोषणाई केलेली होती. सौम्य संगीत व्यवस्थादेखील केलेली होती. तसेच ग्राहकांसाठी विशेष असा मेन्यू साकारण्यात आला होता.
अनेक हॉटेल्समध्ये आगाऊ नोंदणी केली जात होती. प्रियजनांना भेटवस्तू देण्याकडेही कल बघायला मिळत होता. यातून गिफ्ट हाउसमध्ये खरेदीसाठी गर्दी झाल्याचे दृष्य बघायला मिळाले. हार्ट पिलो, टेडीबियर, लव्ह मिटर यासोबत फ्लॉवर लायटिंग, ब्रेसलेट, फ्रेम अशा विविध वस्तूंच्या खरेदीला पसंती मिळाली.
"यंदाच्या व्हॅलेंटाइन डेनिमित्त भेटवस्तू खरेदीला चांगला प्रतिसाद आहे. ग्राहकांचा उत्साह पाहता भेटवस्तूंचे नवनवीन पर्याय उपलब्ध करून देण्यावर भर राहिला आहे. जोरदार खरेदीमुळे व्यावसायिकांमध्येही आनंदाचे वातावरण आहे."- महेंद्र चौधरी, व्यावसायिक.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.