Nashik Water Crisis : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समूहात मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा असूनही पंचवटीसह शहराच्या अनेक भागात अतिशय कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू आहे.
त्यामुळे म्हसरूळ भागात पाण्याची चणचण निर्माण झाली आहे. पावसाने ओढ देऊनही शहराची तहान भागविण्याऱ्या गंगापूर धरणात ऐंशी टक्क्यांपेक्षा अधिक पाण्याचा साठा झाल्याने नाशिककरांवरील पाणीटंचाईचे मळभ मोठ्या प्रमाणावर दूर झाले आहे.
मात्र समाधानकारक पाणीसाठा असूनही शहराच्या अनेक भागात विशेषतः म्हसरूळ भागात कमी दाबाने तसेच अवेळी पाणी पुरवठ्याची नागरिकांची तक्रार आहे. (Low pressure untimely water supply in Mhasrul area Scarcity despite completion of Jalakumbha work nashik)
परिसराची वाढ झालीतरी बोरगड, वाढणे कॉलनी, आदर्शनगर, प्रभागनगर भागात अद्यापही जुन्याच पाइपलाइन आहेत. त्यामुळे या भागातील उंच भागात अतिशय कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. म्हसरूळ भागात पाण्याच्या दोन टाक्या कार्यान्वित आहेत.
त्यातील एक प्रभागनगर येथे तर दुसरी बोरगड येथे आहे. यातील प्रभागनगर येथील जलकुंभ जुना झाला असली तरी सध्या तेथूनच पाणीपुरवठा सुरू आहे. या व्यतिरिक्त सीडीओ- मेरी कार्यालयाजवळ जलकुंभ बांधून पूर्ण आहे.
परंतु इनपूटसह आऊटलेटचे काम थांबल्यामुळे जलकुंभ पूर्ण होऊनही पाणीपुरवठा सुरू झालेला नाही. टाकी पूर्ण झाल्यावर सुरळीत पाणी पुरवठ्याचे आश्वासन दिले जातेय, परंतु तीही वादात सापडल्याने पाणीटंचाई जाणवत आहे.
दरम्यान, गरजवंतांना हेरून महापालिकेतील आगामी निवडणुकीत लक्ष देण्याची म्हणजेच मतदान करण्याची इच्छुकांकडून गळ घातली जात आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
अद्याप महापालिकेच्या निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत, परंतु याही स्थितीत मुबलक पाण्याचे आमिष दाखवून आमच्याकडे लक्ष असू द्या, असा फंडा महापालिका निवडणुकीतील इच्छुकांकडून वापरला जात आहे.
त्यासाठी पाणी न मिळणाऱ्या नागरिकांकडे जाऊन पाणीपुरवठा करतो, मात्र तेवढे आमच्याकडे लक्ष असू द्या’ अशा सल्ल्याचा फंडा सुरू आहे.
"एप्रिलपासून अतिशय कमी वेळ व कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू आहे. नवीन पाण्याची टाकी बांधून पूर्णही झाली आहे, परंतु तांत्रिक कारणाने अद्यापही येथून पाणीपुरवठा होत नाही."
- किरण कोठुळे, चेअरमन, एके हाईटस्, म्हसरूळ"
"पाणीपुरवठ्यासाठी नवीन जलकुंभ बांधून पूर्ण झाला आहे. फक्त फिल्टरेशन प्लॅन्टच्या बाजूने तिची जोडणी बाकी आहे, हे काम पूर्ण झाल्यावर पाणीपुरवठा सुरळीत होईल. त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे."- अरुण पवार, माजी नगरसेवक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.