Nashik Winter Update : निफाड 4.4 अंश, नाशिक 8.6 अंशावर

वातावरणातील शीतलहरींमुळे गारठ्यात कमालीची वाढ झालेली असून, यामुळे पाऱ्यातील घसरण सुरूच आहे.
Nashik Winter Update
Nashik Winter Updateesakal
Updated on

Nashik Winter Update : वातावरणातील शीतलहरींमुळे गारठ्यात कमालीची वाढ झालेली असून, यामुळे पाऱ्यातील घसरण सुरूच आहे.

गुरुवारी (ता. २५) निफाडचे किमान तापमान ४.४ अंश सेल्सिअस, तर नाशिकचे किमान तापमान ८.६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. (lowest minimum temperature was recorded for second day in niphad and nashik winter update news)

सलग दुसऱ्या दिवशी राज्‍यात हे तापमान नीचांकी राहिले आहे. उत्तरेकडील थंड वारा महाराष्ट्रात दाखल झाल्‍याने राज्‍यभरात थंडीची लाट आली आहे. त्‍यातही उत्तर महाराष्ट्रात कडाक्‍याची थंडी सध्या जाणवू लागली आहे. दोन दिवसांपासून नाशिकचे किमान तापमान राज्‍यात नीचांकी राहात आहे. गुरुवारी निफाडचे किमान तापमान ४.४ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.

Nashik Winter Update
Nashik Winter Update : निफाड 5.6 अंश, नाशिक 9 अंशांवर; राज्‍यात नीचांकी तापमान

नाशिकचे किमान तापमान ८.६ अंश सेल्सिअस, कमाल तापमान २७.७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. नाशिकसह पुण्याचेही किमान तापमान ८.६ अंश सेल्सिअस राहिले. दरम्‍यान, वाढलेल्‍या थंडीचा परिणाम जनजीवनावर जाणवत आहे. सायंकाळी ग्रामीण भागासह बहुतांश शहरी भागांमध्येही लवकरच शुकशुकाट होत असल्‍याचे चित्र बघायला मिळत आहे.

महिनाअखेरपर्यंत कायम राहणार थंडीचा जोर

सध्या वातावरणात निर्माण झालेला गारवा या महिना‍अखेरपर्यंत कायम राहणार असल्‍याचा अंदाज हवामान खात्‍याने वर्तविला आहे. त्‍यामुळे नाशिककरांना पुढील आठवडाभर थंडीची अनुभूती घ्यावी लागणार आहे. फेब्रुवारीपासून पाऱ्यात वाढ होण्यास सुरवात होण्याचाही अंदाज आहे.

Nashik Winter Update
Nashik Winter Update : निफाड 5.6 अंश, नाशिक 9 अंशांवर; राज्‍यात नीचांकी तापमान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.