Nashik Lumpy Disease : निफाड तालुक्यात 90 जनावरांना लम्पीची लागण; 3 मृत्युमुखी

Veterinary Officer during vaccination for lumpy disease
Veterinary Officer during vaccination for lumpy diseaseesakal
Updated on

Nashik Lumpy Disease : निफाड तालुक्यात लम्पी चर्मरोगाच्या तिसऱ्या लाटेने पशुधन त्रस्त झाले आहे. पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरणासह काटेकोर नियोजन केले जात आहे. आजार नियंत्रणात ठेवण्यासाठी ७४ हजार लम्पी प्रतिबंधक लशींच्या मात्रा प्राप्त झाल्या आहेत. गोठ्याची फवारणी, लसीकरण यांसह ‘माझा गोठा, स्वच्छ गोठा’, हे अभियान राबविले जात आहे.

दरम्यान, निफाड तालुक्यात आतापर्यंत ९० जनावरे लम्पीच्या विळख्यात सापडली आहेत. त्यातील तीन जनावरे दगावली असून, २६ जनावरे उपचारानंतर ठणठणीत बरी झाली आहेत. ६१ बाधित जनावरांवर उपचार सुरू आहेत. (Lumpy infected 90 animals in Niphad taluka nashik news)

निफाड तालुक्यात ७३ हजार २०० गोवर्गीय पशुधन आहे. त्यातील सुमारे ७० हजार जनावरांना लशीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. अस्वच्छतेमुळे वाढणारे डास, गोचडीमुळे लम्पीचा फैलाव होत आहे. निफाड तालुक्यात पिंपळगाव बसवंत, कोकणगाव, शिवरे, कसबे सुकेणे, कोठुरे, सारोळे खुर्द, सायखेडा, विंचूर, देवपूर, शिवडी, दिक्षी या अकरा गावांत लम्पीबाधित जनावरे आढळल्याने लम्पीचा केंद्रबिंदू म्हणून नोंद झाली आहे.

पशुसंवर्धन विभागाने या गावातील पाच किलोमीटरपर्यंत लसीकरणांना प्राधान्य दिले आहे. पिंपळस, कोकणगाव, सारोळे खुर्द येथे तीन जनावरे लम्पीने दगावली आहेत. सध्या ६१ जनावरे उपचार घेत आहेत. इतर जनावरांपासून त्यांचे विलगीकरण करण्यात आले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Veterinary Officer during vaccination for lumpy disease
Lumpy Skin : वासरांतील लम्पी स्कीन रोगाचा प्रसार कसा रोखायचा? | Lumpy Skin

पशुसंवर्धन विभागाची तत्परता

अपुरे कर्मचारी असूनही तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज कळसकर, डॉ. सुनील अहिरे, डॉ. कपिल तोरणपवार यांच्या मार्गदर्शनाखाली लम्पीच्या आजाराचा अटकाव व लसीकरण मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे. लम्पीच्या नियंत्रणासाठी काटेकोरपणे नियोजन केले जात आहे. लवकरच सर्व पशुधनांचे लसीकरण पूर्ण होणार आहे.

"लम्पी हा वेळेत उपचार केल्यास बरा होऊ शकतो. लक्षणे दिसताच जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी शेतकऱ्यांनी संपर्क साधवा." -डॉ. पंकज कळसकर, पशुधन विकास अधिकारी, निफाड

Veterinary Officer during vaccination for lumpy disease
Jalgaon Lumpy Disease : चाळीसगावात जनावरांना ‘लंपी’ची लागण; पशुपालकांना न घाबरण्याचे आवाहन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.