Nashik Cyber Crime: घरबसल्या पैसे कमविण्याचे आमिष पडले महागात; महिलेला 15 लाखांना घातला गंडा

Cyber Crime
Cyber Crimeesakal
Updated on

Nashik Fraud Crime : सोशल मीडियावर ऑनलाईन काम करून घरबसल्या पैसे कमविण्याचे आमिष दाखवून सायबर भामट्याने एका ४४ वर्षीय महिलेला तब्बल १५ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी नाशिक सायबर पोलिसात अज्ञात संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (lure of making money from home Fraud of 15 lakhs to woman Nashik cyber Crime)

सोशल मीडियावर घरबसल्या ऑनलाईन जॉब करण्याबाबत जाहिराती केल्या जातात. या जाहिराती पाहून गरजवंत अशा आमिषांना बळी पडत असल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत.

यासंदर्भात सायबर पोलिसांकडून सातत्याने जनजागृती केली जात असतानाही नागरिक सायबर भामट्यांच्या अशा भुलथापांना बळी पडत आहेत. अशा एका घटनेत महिलेची फसवणूक झाली आहे.

प्रिती संग्राम कांबळे (रा. कॅनडा कॉर्नर, नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांना गेल्या २५ एप्रिल रोजी ९५४१०५०७८८ या व्हॉटसॲप क्रमांकावर अज्ञात संशयिताने संपर्क साधून घरी बसून पैसे कमविण्याबाबत सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Cyber Crime
Mumbai Crime : मला ब्लॉक का केलं...असे विचारताच महिलेचा पती व तरुणाचा राडा

टेलीग्राम या सोशल मीडियाच्या साईटवरील कामासंदर्भात त्यांना सांगण्यात आले. टेलीग्राम चॅनेलवर सुरू असलेल्या कामाचा मोबदला ऑनलाईन जमा होत असल्याचे संशयितांनी भासविले.

त्यानंतर जादा परतावा देण्याच्या बहाण्याने संशयितांनी या ना त्या कारणांने प्रिती कांबळे यांना वेगवेगळ्या अकाऊंटवर पैसे भरण्यास भाग पाडले. त्यानुसार प्रथम १० लाख १ हजार ९०० रुपये, युपीआयद्वारे ५ लाख ६ हजार ९६१ रुपये असे एकूण १५ लाख ८ हजार ८६१ रुपये सायबर भामट्यांनी भरावयास लावले.

त्यानंतरही कांबळे यांना जॉबचे पैसे मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. सदरचा प्रकार गेल्या एप्रिल-मे महिन्यात झाला आहे.

याप्रकरणी संशयित मोबाईलधारकांस आठ बँक खातेधारकांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख हे तपास करीत आहेत.

Cyber Crime
Solapur Crime : तुला जिवंत सोडणार नाही म्हणत 16 जणांचा तरुणावर हल्ला; लाकूड, लाथाबुक्क्यांनी मारहाण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.