Made in Malegaon Fest : मालेगावी 3 फेब्रुवारीपासून मेड इन मालेगाव फेस्टिवल!

Logo of Made in Malegaon Festival.
Logo of Made in Malegaon Festival.esakal
Updated on

मालेगाव (जि. नाशिक) : शहरात मेड इन मालेगाव फेस्टिवल ३ ते ८ फेब्रुवारी या कालावधी होणार आहे. अशा स्वरूपाचा महोत्सव तिसऱ्यांदा होत असल्याने येथील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सदर फेस्टिवल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष आसिफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम होईल. (Made in Malegaon Festival from February 3 at malegaon nashik news)

येथे होणाऱ्या फेस्टिवलमध्ये शहरात तयार होणाऱ्या कपडे, लुंगी, साडी आदींसह विविध वस्तुंना प्राधान्य दिले जाणार आहे. यापूर्वी येथे दोन फेस्टिवल घेण्यात आले. दोन्ही कार्यक्रमांना शहरातील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता.

येथे नॅशनल कंपाउंडच्या पाठीमागील प्रशस्त जागेत फेस्टिवल होणार आहे. तब्बल चार वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथे पुन्हा मालेगाव महोत्सव होत आहे. फेस्टिवलमध्ये शंभर विविध प्रकारचे स्टॉल लावण्यात येणार आहेत.

हेही वाचा : योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त

Logo of Made in Malegaon Festival.
SAKAL Exclusive : प्राथमिक शिक्षकांच्या मदतीला Vinoba App!

यात ५० स्टॉल खाद्यपदार्थांचे असतील. लहान मुलांसाठी किड्‌स झोन असणार आहे. विद्यार्थी व नागरिकांच्या मनोरंजनासाठी विविध कार्यक्रम होणार आहेत. बसण्यासाठी तीन हजार खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

येथील ४५ उर्दू शाळेतील शेकडो विद्यार्थी स्पर्धांमध्ये भाग घेणार आहेत. गझल, टॅलेंट शो, प्रश्‍नमंजूषा यासह विविध स्पर्धा पार पडतील. ३ ते ८ फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या फेस्टिवलमध्ये मालेगावकरांनी सहभागी व्हावे असे आवाहन हाफीस अनीस अजहर यांनी केले आहे.

Logo of Made in Malegaon Festival.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात; Padma Bhushan राम सुतार साकारताय 21 फूट उंच पुतळा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()