नाशिक रोड : मानवी आरोग्याला घातक मागुर मासा उत्पादन व निर्मितीवर बंदी असताना आगर टाकळी येथील एका घरात व घराबाहेर जवळपास तीनशे किलो मागुर मासा जप्त करण्यात आला आहे. या संदर्भात मत्स्य व्यवसाय विभाग व उपनगर पोलिस यांनी संयुक्तरित्या कारवाई केली आहे. (Magur fish stock seized from house in Takli Nashik Crime News)
हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस
मत्स्य व्यवसाय विभागाचे उपायुक्त संजय वाटेगावकर, वि. अ. लहारे, पवन काळे, पोलिस शिपाई गणेश गोसावी, सुदाम झाडे यांनी ही कारवाई केली आहे. गुप्त बातमीदारामार्फत मत्स्य व्यवसाय विभागातील अधिकाऱ्यांना माहिती मिळाली असता, संशयित घराजवळ भेट दिली.
या वेळी संशयित किशोर काशिनाथ आडणे यांच्या घराच्या बाहेरील टाकीत व घरात हा मासा आढळून आला. या माशाची किंमत अठरा हजार रुपये आहे. यासंदर्भात उपनगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.