Mahamicrocon 2023 : SMBTमध्ये सूक्ष्म जीवशास्रावर तीनदिवसीय राज्यस्तरीय परिषद!

Mahamicrocon 2023
Mahamicrocon 2023esakal
Updated on

Mahamicrocon 2023 : एसएमबीटी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अॅन्ड रिसर्च सेंटर येथे ८, ९ व १० सप्टेंबरला सूक्ष्म जीवशास्रावर राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

‘महामायक्रोकॉन २०२३’ असे या परिषदेचे नाव असून, या परिषदेसाठी दोनशेपेक्षा अधिक तज्ज्ञ, तसेच व्याख्यात्यांची उपस्थिती असणार आहे. (Mahamicrocon 2023 Three Day State Level Conference on Microbiology at SMBT nashik)

इंडियन असोसिएशन ऑफ मेडिकल मायक्रोबायोलॉजीस्टच्या महाराष्ट्र स्टेट चाप्टरची ही २७ वी परिषद आहे. परिषदेच्या एक दिवस आधी ८ सप्टेंबरला प्री कॉन्फरन्स सीएमई आयोजित करण्यात आली आहे.

त्यानंतर दोनदिवसीय परिषदेला ९ सप्टेंबरला सकाळी प्रारंभ होईल. दोनदिवसीय परिषदेसाठी प्रतिजैविक विरोधक : योग्य शोध योग्य उपचार (टॅकलिंग एएमआर : राइट डिटेक्शन, राइट प्रिस्क्रिप्शन) अशी थीम ठेवण्यात आली आहे.

दिवसागणिक प्रतिजैविकांना प्रतिसाद मिळणे अवघड होत आहे. तेव्हा या प्रतिजैविकांचा वापर योग्य प्रमाणात होणे आवश्यक आहे. हाच विषय घेऊन या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

तसेच यादरम्यान सूक्ष्म जीवशास्रातील नवनवीन शोधांचाही आढावा घेतला जाणार आहे. परिषदेसाठी तब्बल दोनशेपेक्षा अधिक मान्यवर तज्ज्ञांनी उपस्थिती नोंदविली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Mahamicrocon 2023
BSE आणि NSE जाणार गुजरातला? IFSC मध्ये होऊ शकतात विलीन, काय आहे प्लॅन

यामध्ये डॉ. मीना मिश्रा (एम्स, नागपूर), डॉ. नवीन कावरे (एम्स, भोपाळ), डॉ. छाया चांदे (प्रोफेसर अॅन्ड हेड व्ही. एम. मेडिकल कॉलेज), डॉ. अमिता जोशी (प्रोफेसर अॅन्ड हेड गव्हर्न्मेंट मेडिकल कॉलेज, अलिबाग), डॉ. प्रतिभा नारंग (प्रोफेसर इम्रीटस, महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस सेवाग्राम), डॉ. विकास गौतम (पीजीआय, चंडीगड), डॉ. अरुणा पुजारी (कन्सल्टंट, ब्रीच कॅन्डी, मुंबई) यांचा समावेश आहे.

परिषदेसाठी एसएमबीटी सेवाभावी ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. हर्शल तांबे, बोर्ड मेंबर श्रीराम कुऱ्हे, डीन डॉ. मीनल मोहगावकर यांच्यासह मान्यवरांनी या परिषदेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

परिषदेचे आकर्षण

परिषदेसाठी नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेस इंडियाचे डॉ. व्ही. एम. कटोच यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

परिषदेत दोन सिम्पोझियम, एक हरदास पाठक ओरेशन, प्रेसेडेन्शियल ओरेशन, ज्युनिअर शास्रज्ञांसाठी पी. एम. खरे पुरस्कार, तसेच पेपर आणि पोस्टर्स प्रेझेंटेशन.

Mahamicrocon 2023
Nashik Rain Update: शहरात 40 दिवसांच्या खंडानंतर पावसाची हजेरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.