Maha Online Portal : महाऑनलाइन पोर्टलचे काम 8 दिवसांपासून विस्कळित

Mahaonline portal has been disrupted for 8 days nashik news
Mahaonline portal has been disrupted for 8 days nashik newsesakal
Updated on

Maha Online Portal : दहावी आणि बारावीच्या निकालानंतर महाविद्यालय प्रवेशासाठी आवश्यक असणारे दाखले वाटप करणारी यंत्रणा कुचकामी ठरली आहे. गत आठ दिवसांपासून महाऑनलाइन पोर्टल बंद असल्याने दाखले वाटप प्रक्रिया ठप्प झाली आहे.

प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्र मिळत नसल्याने प्रमाणपत्रासाठी विविध सेतू केंद्रात विद्यार्थी पालकांच्या येरझारा वाढल्या आहेत. (Mahaonline portal has been disrupted for 8 days nashik news)

नागरिकांना सरकारी कागदपत्रे मिळवण्यासाठी होणारा त्रास कमी करण्यासाठी बहुतांश कागदपत्रे आता ऑनलाइन देण्याची व्यवस्था प्रशासनाने केली आहे. त्यासाठी महसूल विभागाचे महाऑनलाइन हे संकेतस्थळ विकसित केले.

सेतू सुविधा केंद्रातून नागरिकांना जातीचा दाखला, नॉन क्रिमीलेअर, उत्पन्न, डोमिसाईल आदी प्रमाणपत्रासह विविध कारणांसाठी लागणारी प्रतिज्ञापत्रे महाऑनलाइन संकेतस्थळावरून काढून दिली जातात. मात्र, गत आठ दहा दिवसांपासून संकेतस्थळावर त्रुटी येत आहे. एवढेच नाही तर बहुतांश वेळा संकेतस्थळ बंद राहत आहे.

संकेतस्थळ सुरू झाले तरी कागदपत्रांची पूर्तता होत नाही. शालेय प्रवेशासाठी वेळेत प्रमाणपत्रे, कर्जप्रकरणासाठी तलाठ्याकडून डिजिटल सातबारे मिळत नाहीत. शेतीच्या इतर कामासाठी लागणारे कागदपत्रेही मिळत नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Mahaonline portal has been disrupted for 8 days nashik news
Maha Electric Vehicle Policy: इलेक्ट्रिक वाहनांबाबतचं धोरण शिंदे सरकारनं बदललं; आदित्य ठाकरे संतापले

सध्या शैक्षणिक प्रवेश सुरू आहेत. प्रमाणपत्रे काढण्यासाठी विद्यार्थी, पालकांची धावपळ सुरू आहे. दाखले मिळण्यासाठी विद्यार्थी, पालकांच्या सेतू केंद्रात चकरा वाढल्या आहे. संकेतस्थळ बंद आहे, त्याला वरूनच अडचण आहे. नेमके कधी सुरळीत सुरू होईल सांगत येत नसल्याचे सांगण्यात येते.

शैक्षणिक प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे वेळेत मिळतील की नाही याबाबत मात्र विद्यार्थी, पालक चिंतेत असल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी नागरिक सेतू केंद्र चालकांशी वाद घालत आहेत याचा मनस्ताप सेतू केंद्र चालकांना सहन करावा लागत आहे. यामुळे शासनाने ते तत्काळ दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.

प्रवेश प्रक्रियेवर परिणाम

संकेतस्थळ अपडेट करण्याच्या नावाखाली हे संकेतस्थळच बंद असल्याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. विशेष म्हणजे संकेतस्थळ अपडेट करण्याचे काम दिवसा केले जात असल्याने रात्री काही काळासाठी हे संकेतस्थळ सुरू आणि लागलीच बंद होत आहे.

Mahaonline portal has been disrupted for 8 days nashik news
Maha CET Cell Application : व्‍यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशाचे अपडेट्‌स ‘ॲप’वर!

परिणामी विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे उत्पन्नाचे दाखले, अधिवास आणि रहिवास दाखले मिळत नसून त्या अभावी महाविद्यालय प्रवेश रखडत आहे.

विस्कळित सेवेमुळे त्रास

प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणाऱ्या बाबी अपलोड केल्या तरी त्या होत नाही. उत्पन्नाचा दाखला काढल्यावर त्यावर विशेष क्रमांक येत आहे.

सरकारी व अन्य कामासाठी तलाठ्याकडून डिजिटल सातबारा देण्याचे काम सुरू आहे. हा डिजिटल सातबारा अनेक कामांसाठी ग्राह्य धरला जातो. मात्र, आठ दिवसांपासून संकेतस्थळ बंद असल्याने तलाठ्याकडून डिजिटल स्वाक्षरी असलेला सातबारा, आठ अ उताराही मिळेनासा झाला आहे.

Mahaonline portal has been disrupted for 8 days nashik news
Setu Abhyaskram : यंदाही राबवणार सेतू अभ्यासक्रम; कृतिपत्रिका तयार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()