Maharashtra Home Guard Recruitment : राज्यात होमगार्डची भरती लवकरच! सुमारे साडेनऊ हजार पदांसाठी भरतीची प्रक्रिया

Home Guard Recruitment : गृह विभागामार्फत येत्या ऑगस्ट महिन्यापासून होमगार्डस्‌ची भरतीची प्रक्रिया राबविली जाणार असून, सुमारे ९ हजार ७०० पदासाठी ही भरती होण्याची शक्यता आहे. दरम्यान, नाशिक जिल्ह्यात ६० जागा रिक्त आहेत.
Home Guard File photo
Home Guard File photoesakal
Updated on

Nashik News : आगामी सणउत्सव आणि निवडणुकांचा हंगाम पाहता महाराष्ट्र पोलीस दलाला मदतीला होमगार्ड धावून येतात. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये होमगार्डस्‌ची भरती झालेली नाही. गृह विभागामार्फत येत्या ऑगस्ट महिन्यापासून होमगार्डस्‌ची भरतीची प्रक्रिया राबविली जाणार असून, सुमारे ९ हजार ७०० पदासाठी ही भरती होण्याची शक्यता आहे. दरम्यान, नाशिक जिल्ह्यात ६० जागा रिक्त आहेत. (Maharashtra Nashik home Guard recruitment in state soon)

येत्या काही महिन्यांमध्ये सणवार तर आहेच, शिवाय विधानसभा निवडणुका आटोपल्यानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्याही निवडणुका आहेत. पोलिस दलावर बंदोबस्ताचा अतिरिक्त ताण येणार आहे. अशावेळी पोलिसांच्या दिमतीला होमगार्डस्‌ असतात. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये होमगार्डस्‌ची भरती झालेली नाही.

त्या अनुषंगाने गृह विभागामार्फत येत्या ऑगस्ट महिन्यात होमगार्डस्‌ची भरती प्रक्रिया राबविला जाणार आहे. यासाठी १५ ऑगस्टपासून ऑनलाइन अर्ज नोंदणी प्रक्रियाला प्रारंभ होण्याची शक्यता आहे. होमगार्डस्‌साठी अर्ज करणार्या उमेदवारांना रहिवाशी ठिकाण असलेल्या पोलिस ठाण्याच्या क्षेत्रातच अर्ज करता येणार आहे. अर्ज नोंदणी करण्यापूर्वी जाहीर होणाऱ्या अंतिम अधिसूचनेत रिक्त जागांची माहिती दिली जाणार आहे. (latest marathi news)

Home Guard File photo
Nashik Police Recruitment : खाकी वर्दीसाठी झटणाऱ्या युवतींचे परिश्रम फळाला!

असा मिळतो भत्ता

होमगार्डस यांना नियमित बंदोबस्त नसतो. परंतु सणवार, निवडणूक काळात त्यांची नेमणूक पोलिसांसमवेत केली जाते. बंदोबस्त काळामध्ये प्रतिदिन ७०० रुपये आणि १०० रुपये उपहार भत्ता दिला जातो. तसेच, प्रशिक्षण काळात ३५ रुपये खिसाभत्ता आणि १०० रुपये भोजनभत्ता मिळतो. साप्ताहिक कवायतीसाठी ९० रुपये भत्ता दिला जातो तर, होमगार्डमध्ये ३ वर्षे सेवा पूर्ण केल्यास पोलिस, वन विभाग, अग्निशमन दलात ५ टक्के आरक्षणही मंजूर आहे.

पात्रता अन्‌ निकष असे....

होमगार्डसाठी शैक्षणिक पात्रता : किमान १० वी उत्तीर्ण

वयोमर्यादा : २० ते ५०

पुरुषांसाठी उंची : १६२ सें.मी.

महिलांसाठी उंची : १५० सें.मी.

Home Guard File photo
India Post Recruitment: पोस्ट खात्यात 44,228 पदांसाठी 'मेगा भरती'; 5 ऑगस्टपूर्वी असा करा अर्ज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()