Police Recruitment Written Exam : पोलीस भरतीसाठी लेखी परीक्षा 7 जुलैला! उमेदवारांना प्रतिक्षा प्रवर्गनिहाय निवड यादीची

Police Recruitment : मैदानी चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांना आता प्रवर्गनिहाय गुणवत्ता यादीची प्रतिक्षा असून लवकरच ती जाहीर केली जाणार आहे.
Written Exam
Written Examesakal
Updated on

Police Recruitment Written Exam : महाराष्ट्र पोलीस दलाच्या रिक्त शिपाई पदाकरीता सुरू असलेली मैदानी चाचणी आटोपली असून, येत्या रविवारी (ता. ७) लेखी परीक्षा होणार आहे. यामुळे मैदानी चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांना आता प्रवर्गनिहाय गुणवत्ता यादीची प्रतिक्षा असून लवकरच ती जाहीर केली जाणार आहे. नाशिक शहर आयुक्तालयातील ११८ तर ग्रामीणमधील ३२ रिक्त जागांसाठी मैदानी चाचणी घेण्यात आलेली आहे. (Written Exam for Police Recruitment on July 7)

शहर पोलिस आयुक्तालयातील रिक्त ११८ जागांसाठी ५ हजार ५९० पुरुष, २ हजार १२५ महिला व दोन तृतीयपंथी उमेदवारांनी अर्ज केले होते. यातील ४ हजार ३७४ उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आली. पंचवटीतील मीनाताई ठाकरे स्टेडिअम येथे १९ ते ३० जून दरम्यान, घेण्यात आलेल्या मैदानी चाचणीत दोनशेपेक्षा अधिक उमेदवार अपात्र ठरले आहेत. पोलिस आयुक्तालयाने ४ हजार ३७४ उमेदवारांची गुणतालिका जारी केली असून त्यानुसार पंचवीसपेक्षा जास्त गुण मिळविलेल्या उमेदवारांची निकष व प्रवर्गानुसार लेखी परीक्षेसाठी निवड केली जाणार आहे.

उमेदवारांना प्रतिक्षा

मैदानी चाचणीत चार हजारांपैकी बहुतांशी पुरुष उमेदवारांना १६०० मी. व ८०० मीटर धावण्याच्या चाचणीत महिला उमेदवारांना शून्य गुण मिळाले आहेत. गोळाफेकमधये आउटऑफ गुण असले तरी, उत्तीर्ण होण्यासाठी २५ गुण न मिळाल्याने ते पुढच्या प्रक्रियेतून बाद होण्याची शक्यता अधिक आहे. (latest marathi news)

Written Exam
Nashik Police Recruitment : पोलिस शिपाई भरतीसाठी पदवीधरांनीही आजमावले नशिब; बेरोजगारीची दाहकता

एका पदाकरीता दहा उमेदवार या समीकरणानुसार २५ पेक्षा जास्त गुण असलेले सुमारे १८०० उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरण्याची शक्यता आहे. यावेळी मैदानी चाचणीला १२ वी उत्तीर्ण, पदवीधर, पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्यांसह इंजिनीअरिंग, फार्मसी व इतर व्यावसायिक शिक्षण घेतलेल्यांनीही घाम गाळला आहे.

मोबाईलला मनाई

७ जुलै रोजी होणार्या लेखी परीक्षेसाठी उमेदवारांना आयुक्तालयाकडूनच पॅड आणि काळा पेन देण्यात येणार आहे. यावेळी उमेदवारांनी त्यांचे ओळखपत्र आणि चेस्ट क्रमांक आणणे अनिवार्य असेल. तसेच, लेखी परीक्षेसाठी मोबाईल वा अन्य कोणतेही इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाईस आणण्यास मनाई करण्यात आलेली आहे.

Written Exam
Nashik Police Recruitment : मैदानी चाचणीला महिलांची दमछाक! तृतीयपंथी उमेदवारांची दांडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.