Maharashtra Politics : उत्तर महाराष्ट्रात पदोपदी पडणार ठिणग्या! राष्ट्रवादीपुढे उभारीचे जबरदस्त आव्हान

Maharashtra Politics : उत्तर महाराष्ट्रात पदोपदी पडणार ठिणग्या! राष्ट्रवादीपुढे उभारीचे जबरदस्त आव्हान
esakal
Updated on

Maharashtra Politics : राज्यात शिवसेनेच्या फुटीनंतर भाजपने उत्तर महाराष्ट्रातील नाशिकसह दिंडोरी, धुळे, जळगाव, रावेर या लोकसभा मतदारसंघाकडे लक्ष केंद्रित केले होते.

त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील चाळीस आमदार भाजपसोबत सत्तेस सहभागी झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस ‘घड्याळ' चिन्हासह लढणार असल्याचे शपथविधीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले. (maharashtra politics big challenge for NCP to build party newly in North Maharashtra nashik news)

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः ‘शरद पवार' हाच पक्षाचा चेहरा असेल, असे स्पष्ट केले. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये उत्तर महाराष्ट्रात उमेदवारीवरून पदोपदी ठिणग्या पडणार असल्याचे चित्र आहे. मात्र राष्ट्रवादीपुढे नव्याने उभारणीचे मोठे आव्हान असेल हे निश्चित!

नाशिकसह धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यांत संघटनात्मक काम उभे करण्याचे जबरदस्त आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसपुढे उभे ठाकल्याचे आजच्या घडामोडीनंतर समोर येत आहे. उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपचे गिरीश महाजन, डॉ. विजयकुमार गावित, शिंदे गटाचे गुलाबराव पाटील, दादा भुसे यांच्यापाठोपाठ आता छगन भुजबळ आणि अनिल भाईदास पाटील यांना राज्यात मंत्रिपद मिळाले.

नाशिक जिल्ह्याचा विचार केल्यावर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ॲड. माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, नितीन पवार या आमदारांशी संवाद साधल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून मतदारसंघातील विकासकामे होणार असल्याने आपण त्यांच्यासोबत राहणार असल्याचे त्यांनी बोलून दाखविले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Maharashtra Politics : उत्तर महाराष्ट्रात पदोपदी पडणार ठिणग्या! राष्ट्रवादीपुढे उभारीचे जबरदस्त आव्हान
NCP Sharad Pawar News : तेल लावलेले पैलवान पुन्हा आखाड्यात! आज पवारांची कराडमध्ये जाहीर सभा

विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि आमदार सरोज आहिरे यांना आजच्या शपथविधीवेळी पाहिल्याचे राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील नेत्यांनी सांगितले. श्री. झिरवाळ आणि आहिरे यांच्याशी मात्र संपर्क होऊ शकला नाही. ही सारी परिस्थिती पाहता, पक्षाध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा एकदा नाशिक जिल्हा कसा प्रतिसाद देणार, याबद्दलची उत्सुकता शिगेला पोचली आहे.

खानदेशात राष्ट्रवादीला मंत्रिपद

खानदेशमधील जळगाव लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचा आगामी चेहरा म्हणून मंत्रिपदाची शपथ घेतलेले अनिल भाईदास पाटील यांच्या समर्थकांनी तयारी सुरू केली होती. त्यामुळे भाजपला एक प्रकारची मदत होणार काय? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. रावेरमधून हरिभाऊ जावळे यांचा मुलगा अमोल जावळे यांच्या समर्थकांनी लोकसभेसाठी मोर्चेबांधणी सुरू केली होती.

त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी सध्या शरद पवार यांच्यासोबत असून, काही बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया स्थानिक माध्यमांना दिली. पंधरा दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री पवार यांनी १५ जूनला नंदूरबारमध्ये जाऊन पूर्वीच्या बालेकिल्ल्यात ‘बूस्टर डोस’ दिला होता. धुळ्यात उपमुख्यमंत्री पवारांचे समर्थक म्हणून म्हाडाचे माजी सभापती किरण शिंदे, जिल्हा परिषदेचे सदस्य किरण पाटील यांच्याकडे पाहिले जाते.

Maharashtra Politics : उत्तर महाराष्ट्रात पदोपदी पडणार ठिणग्या! राष्ट्रवादीपुढे उभारीचे जबरदस्त आव्हान
Ajit Pawar: राष्ट्रवादीच्या बंडामुळे काँग्रेसला काळजी विरोधी पक्षांच्या ऐक्याची; राजकीय फायद्यासाठी विचारमंथन

पण त्याचवेळी नवीन कार्यकर्ते आणि जुने पदाधिकारी असा संघर्ष धुळ्यात सुरू झाला आहे. म्हणजेच, काय तर खानदेशातील राष्ट्रवादीचे एकमेव आमदार आता सत्तेत सहभागी झाल्याने संघटनात्मकदृष्ट्या बांधणीसाठी राष्ट्रवादीला तारेवरची कसरत करावी लागेल, असे दिसते.

राजकीय ठळक नोंदी

- नाशिक महापालिकेतील सत्तेत भाजपला रस आहे. मात्र प्रत्यक्षात शिंदे गटाचा प्रभाव आहे. अशा परिस्थितीत मंत्री झालेले छगन भुजबळ यांची दावेदारी कशी राहणार? यास महत्त्व प्राप्त झाले आहे.

- नाशिकमधून शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे आहेत. श्री. भुजबळ नाशिक लोकसभा मतदारसंघाचा दावा सोडणार काय? आणि नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे ते काय करणार? असे प्रश्‍न यामुळे पुढे येतील.

- राज्यातील राजकीय उलथापालथीनंतर उत्तर महाराष्ट्रातील राजकारणात विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसमधील स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

Maharashtra Politics : उत्तर महाराष्ट्रात पदोपदी पडणार ठिणग्या! राष्ट्रवादीपुढे उभारीचे जबरदस्त आव्हान
Sharad Pawar : गडी पुन्हा एकटा निघाला! 82 वर्षाचा 'तरुण' आज गुरूच्या साक्षीने करणार मोठा एल्गार!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.