NCP Political Crisis : मुंबईतील आजच्या बैठकींना राष्ट्रवादीचे दोन्ही गट जाणार

Rashtravadi Congress Update : बैठकीला जाण्यासाठी तयारीचे नियोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे हे पाहत होते.
Sharad pawar vs Ajit pawar
Sharad pawar vs Ajit pawarEsakal
Updated on

Maharashtra Politics Update : येथील राष्ट्रवादी भवनातील बैठकीवरुन झालेल्या राड्यानंतर मुंबईत बुधवारी (ता. ५) होत असलेल्या बैठकींसाठी जाण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांकडून तयारी करण्यात आली आहे. (maharashtra politics Both groups of NCP will go to today meeting in Mumbai nashik news)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सकाळी अकराला एमईटी महाविद्यालयात होत असलेल्या बैठकीसाठी मंत्री छगन भुजबळ यांच्या शहर-जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांसह समर्थकांची मोठी उपस्थिती राहणार आहे.

बैठकीला जाण्यासाठी तयारीचे नियोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे हे पाहत होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Sharad pawar vs Ajit pawar
Ajit Pawar Latest News : शपथविधीला अजित पवारांसोबत पण शरद पवारांना वडील मानणाऱ्या 'या' महिला आमदार नॉट रिचेबल

जिल्ह्यातील आमदार, प्रदेश पदाधिकारी नानासाहेब महाले, बाळासाहेब कर्डक, प्रा. कविता कर्डक, शहर आणि जिल्ह्यातील पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, विभागीय अध्यक्ष, तालुकाध्यक्ष, प्रदेश प्रतिनिधी हे बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत.

एमईटी महाविद्यालयाच्या सभागृहात होत असलेल्या बैठकीची तयारी माजी खासदार समीर भुजबळ करत आहेत.

या सभागृहात पाचशे प्रतिनिधी बसतील एवढी आसन क्षमता असल्याने प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मुंबईला बैठकीसाठी निघावे, असे राष्ट्रवादी भवनात उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना सांगण्यात आले. बैठकीसाठी न जाणाऱ्यांनी बुधवारी पुन्हा राष्ट्रवादी भवनात उपस्थित राहावे, असेही सांगण्यात आले आहे.

Sharad pawar vs Ajit pawar
Ajit Pawar: 'गडी एकटा निघाला...83 वर्षाचा योद्धा...', अजित पवारांच्या वाटेत शरद पवारांचे बॅनर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.