Nashik : महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा जुलैत

MPSC Exam
MPSC Examesakal
Updated on

नाशिक : महाराष्ट्र दुय्यम सेवा (Maharashtra Secondary Service) अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा (Mains Exam) २०२१ च्‍या तारखांची घोषणा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) केली आहे. त्‍यानुसार नाशिकसह मुंबई, पुणे, अमरावती, औरंगाबाद, नागपूर येथील परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे. जुलैमध्ये या परीक्षेचे पदनिहाय पेपर घेतले जाणार आहेत. (Maharashtra Secondary Service Main Examination in July Nashik News)

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे जाहीर केलेल्‍या वेळापत्रकानुसार महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २०२१ अंतर्गत तिन्‍ही पदांसाठी संयुक्‍त पेपर क्रमांक एक हा ९ जुलैला होणार आहे. पोलिस उपनिरीक्षकपदासाठी पात्र उमेदवारांचा पेपर क्रमांक दोन हा १७ जुलैला होणार आहे. राज्‍य कर निरीक्षकपदासाठीचा पेपर क्रमांक दोन २४ जुलैला राज्‍यभर पार पडेल, तर सहायक कक्ष अधिकारीपदाची परीक्षा ३१ जुलैला राज्‍यभरातील परीक्षा केंद्रांवर होणार आहे.

१७ जूनपर्यंत नोंदणी मुदत

या वर्षी २६ फेब्रुवारीला घेण्यात आलेल्‍या पूर्व परीक्षेतून पात्रता मिळविणाऱ्या उमेदवारांना या मुख्य परीक्षेत प्रविष्ठ होता येणार आहे. यासाठी या उमेदवारांना नोंदणी करावी लागणार असून, त्‍यासाठी १७ जूनपर्यंत मुदत दिली आहे.

MPSC Exam
खरीप हंगामाच्या तयारीला वेग

अशी आहे पदांची संख्या

-सहाय्यक कक्ष अधिकारी ः १०० पदे

-राज्‍य कर निरीक्षक ः ६०९ पदे

-पोलिस उपनिरीक्षक ः ३७६ पदे

MPSC Exam
आषाढी वारी : संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा; पाहा Photos

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.