नाशिक : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा येत्या काही काळात होण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी चांगलीच कंबर कसली आहे. भाजपनंही यासाठी जोर लावला असून लोकसभा निवडणुकीत राज्यात झालेल्या दारुन पराभवानंतर भाजपसाठी ही निवडणूक महत्वाची असणार आहे.
त्याचमुळं आता महाराष्ट्र जिंकण्यासाठी भाजपकडून गुजरातची मदत घेतली जाणार आहे. यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रणनीती तयार केली असून त्यांच्या आदेशानं भाजपचे आमदार आणि कार्यकर्ते सक्रीय झाल्याची माहिती साम टीव्हीच्या सुत्रांकडून मिळते आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024