Nashik River Video: जगण्यासाठी मृत्यूशी खेळ! पूल नाही.. पोराबाळांसह पोहत पार करावी लागते नदी, व्हिडीओ व्हायरल

Nashik Rain: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांत मुसळधार पाऊस सुरू असून, याचा नागरिकांना मोठा फटका बसत आहे.
River In Khirpada village In Nashik District.
River In Khirpada village In Nashik District.Esakal
Updated on

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांत मुसळधार पाऊस सुरू असून, याचा नागरिकांना मोठा फटका बसत आहे. अशात या पावसाने नाशिक जिल्ह्यालाही झोडपून काढले आहे.

दरम्यान आता नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील कीरपाडा गावातून एक धक्कादाय व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दिसत आहे की, नागरिकांना जिवनावश्यक वस्तू आणायला दुसऱ्या गावात जाण्यासाठी छातीपर्यंत पाणी असलेल्या नदीतून लेकराबाळांना घेऊन प्रवास करावा लागत आहे.

River In Khirpada village In Nashik District.
Ladki Bahin Yojana: अगं बाई अरेच्चा... 1500 येणार होते आला 1 रुपया, नेमका काय विषय झाला? महिला व बालकल्याण मंत्र्यांच स्पष्टीकरण

व्हायरल होत असलेली नदीच्या पुराची दृश्यं ही नाशिक जिल्ह्यातील कीरपाडा गावातील आहेत. जे महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर आहे. या नदीवर पूल नसल्याने ही परिस्थिती निर्माम झाल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. गावकऱ्यांनी पुढे सांगितले की, याचा फटका फक्त त्यांनाच नाहीतर परिसरातील 12 गावांनाही बसतो. पण याकडे सरकारचे लक्षचं नाही.

दरम्यान नदीवर पूल नसल्यानं गावातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू आणायला पलिकडे जाण्यासाठी छातीपर्यंत असलेल्या पाण्यातून लेकराबाळांना डोक्यावर घेऊन जावे लागत आहे. त्यामुळे मोठ्या दुर्घटना होण्याची भीती आहे.

गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अनेकवेळा मागणी करुनही या नदीवर पूल बांधण्यात आला नाही. यासह गेल्या अनेक वर्षांपासून या सीमाभागातील नागरिक विकासकामापासून वंचित असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

River In Khirpada village In Nashik District.
Sanjay Raut: महाराष्ट्रात राजकीय संघर्ष निर्माण होणार, संजय राऊतांची जीभ घसरली... फडणवीस, शिंदेंवर अत्यंत खालच्या भाषेत टीका

दरम्यान यंदाचा पावसाळा सुरू झाल्यापासून नाशिक जिल्ह्यात सर्वत्र चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच धरणांमध्ये चांगला पाणी साठा निर्माण झाला आहे. दारणा धरण, कडवा धरण आणि नांदुरमध्यमेश्वर धरण 100 टक्क्यांपर्यंत भरत आली आहेत. तर भावली धरण 100 टक्क्यांहून अधिक भरले आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण आता पन्नास टक्क्यांहून अधिक भरले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.