Laetst Marathi News : गेल्या काही दिवसांपासून गारठ्यात सातत्याने वाढ होत असून, पाऱ्यातील घसरण सुरूच आहे. मंगळवारी (ता. २६) पारा आणखी घसरला असून, निफाडचे किमान तापमान ८.८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. नाशिकचे किमान तापमान १०.८ अंश नोंदविले आहे.
राज्यातील प्रमुख शहरांच्या तुलनेत नीचांकी तापमान सध्या नाशिकचे राहत आहे.
वाढलेल्या गारव्याने जनजीवनावर परिणाम होत असून, ग्रामीण भागासह शहरी भागातही दिनचर्या विलंबाने सुरू होत आहे. सकाळी सातपर्यंत वातावरणात धुक्याची दुलई पसरलेली दिसत आहे. विशेषतः नदीकाठच्या परिसरात धुक्याची अनुभूती अधिक प्रमाणात येत आहे. गारठ्यात वाढ होत आहे.