नाशिक : महाराष्ट्र -कर्नाटक वादाचे पडसाद सार्वजनिक वाहतूक सेवेवर दिसू लागले आहेत. कनार्टक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसगाड्या काल (ता.६) पासून नाशिकला आलेल्या नाहीत. दुसरीकडे खासगी ट्रॅव्हलर्स कंपन्यांकडून बंगळूरुसह अन्य शहरांसाठी बससेवा कायम सुरु असली तरी बसफेर्या घटविलेल्या आहेत. (MaharashtraKarnataka Dispute Service of Karnataka Corporation stopped Nashik News)
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाची गाडी थेट कर्नाटकमध्ये जात नसली तरी कर्नाटक महामंडळाच्या गाड्या मार्ग नाशिकमार्गे धावत असतात. या बसगाड्यांतून बेळगावला जाणाऱ्या प्रवाशांसह कोल्हापूर, पुण्यासाठी प्रवासी प्रवास करत असतात. परंतु गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राज्यांमध्ये निर्माण झालेल्या तणावाचा फटका आता या बससेवेला बसला आहे. काल (ता.६) पहाटे साडेचारला हुबळीकरिता तर आठला बेळगावकरीता अशा दोन बसगाड्या नाशिकहून सुटल्या.
नाशिकला मुक्कामी आलेल्या कनार्टक महामंडळाच्या या बसगाड्या होत्या. परंतु दैनंदिन वेळापत्रकानुसार बुधवारी (ता.७) सुटण्यासाठी काल बसगाड्या मुक्कामी येणे अपेक्षित होते. परंतु या बसगाड्याच नाशिकला दाखल न झाल्याने बुधवारी नाशिकहून कनार्टकसाठी बसगाडी सुटली नाही. दोन्ही राज्यांतील वाद निवळेपर्यंत बससेवा ठप्प राहाण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तविण्यात आली आहे. दरम्यान दुसरीकडे खासगी ट्रॅव्हर्सकडून मात्र बंगळूरुकरीता बसगाड्या सोडण्यात येत होत्या.
हेही वाचा : Moonlighting And Tax Benefits : ‘मूनलायटिंग’च्या वाटे, नको ‘टॅक्स’चे काटे!
दरांमध्ये अचानक वाढ
बससेवा प्रभावित झालेली असताना खासगी ट्रॅव्हर्सकडून सेवा पुरविली जात असली तरी तिकिटांच्या दरांमध्ये मात्र वाढ करण्यात आलेली आहे. नाशिकहून बंगळूरुकरीता पंधराशे ते दोन हजार रुपये प्रति प्रवासी असे तिकीट आकारले जात होते. दोनशे ते तीनशे रुपयांची वाढ करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.