Success Story: महाराष्ट्राचा 'बेअर ग्रिल्स' प्रशील अंबादेने सर केले जगातील सर्वांत उंच शिखर!

Mount Killimanjaro
Mount Killimanjaroesakal
Updated on

Nashik News : महाराष्ट्राचा बेअर ग्रिल्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रशील अंबादे याने जगातील सर्वांत उंच शिखर (स्टॅंड अलोन माउंटेन) सर केले. दक्षिण आफ्रिकेतील टांझानिया येथील माउंट किलीमांजारो (Kilimanjaro) असे शिखराचे नाव आहे.

ज्याची उंची समुद्रसपाटीपासून पाच हजार ८९५ मीटर (१९ हजार ३४० फूट) इतकी आहे. (Maharashtras Bear Grylls Prasheel Ambade climbed highest peak in world mount kilimanjaro Nashik News)

Mount Killimanjaro
Success Story: मुंबईतल्या चाळीत राहणाऱ्या माणसाने दुबईत बनवली सर्वात महागडी इमारत; पण ही व्यक्ती अदानी-अंबानी नाही तर...

प्रशील हा मूळचा विदर्भातील चंद्रपूरमधील रहिवासी. सध्या दोन वर्षांपासून तो सह्याद्री डोंगररांगेची भटकंती करीत आहे.

लहानपणापासून इतिहास विषयाची आवड आणि ट्रेकिंगचा छंद असल्याने प्रशील साध्या-सोप्या भाषेत छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्वलंत इतिहास लोकांपर्यंत यू ट्यूब चॅनलच्या माध्यमातून पोहोचविण्याचं काम करीत आहे.

गेल्या दोन वर्षांत २०० हून अधिक किल्ले सर करून तो ‘सह्याद्री रॉक adventure’ या कल्याणच्या टीमबरोबर सह्याद्रीतील वजीर सुळका, वानरलिंगी सुळका, नवरा-नवरी सुळका, अलंग मदन कुलंग यांसारख्या अनेक कठीण समजल्या जाणाऱ्या ठिकाणी आरोहण करून लोकांमध्ये साहसी उपक्रमांबद्दल जनजागृती करण्याचं काम psycho prashil या यू ट्यूब चॅनलच्या माध्यमातून करीत आहे.

Mount Killimanjaro
Business Success Story: रतन टाटांच्या मदतीने सुरू केली कंपनी; आज दर महिन्याला कमावतायत कोट्यवधी रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.