Nashik News : नाशिकमध्ये ‘महासंस्कृती महोत्सव’! प्रत्येक जिल्ह्यासाठी 2 कोटींच्या खर्चास मान्यता

ता. १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत सलग पाचदिवसीय महासंस्कृती महोत्सव व त्यावरील आयोजन होणार आहे
funding
fundingesakal
Updated on

नाशिक : शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागातर्फे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवांतर्गत स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबरोबर कला व संस्कृतीचे जतन आणि संवर्धन होऊन स्वातंत्र्यलढ्यातील ज्ञात, अज्ञात लढवय्यांची माहिती सामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने राज्य शासनातर्फे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पाचदिवसीय ‘महासंस्कृती महोत्सव’ होणार आहे. त्यासाठी ७३ कोटी १० लाखांचा निधी खर्च होईल. (Mahasanskruti Mahotsav in Nashik 2 crore sanctioned for each district Nashik News)

ता. १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत सलग पाचदिवसीय महासंस्कृती महोत्सव व त्यावरील आयोजन होणार आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यासाठी दोन कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली. महासंस्कृती महोत्सवासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या संचालकांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निधी वितरित केला जाणार आहे. जिल्हास्तरावरील प्रचार व प्रसिद्धीसाठी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना अडीच लाख रुपये दिले जातील.

महोत्सवाच्या आयोजनासाठी प्रतिजिल्हा दोन कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. उपलब्ध निधीपेक्षा अधिक निधी खर्च झाल्यास जिल्हा नियोजन विकास समितीच्या माध्यमातून निधी उभारला जाईल. महोत्सवासाठी जिल्हा समन्वय व संनियंत्रण समितीची रचना करण्यात आली आहे.

funding
Sanjay Raut : यापूर्वी छापे पडले, त्याचे काय झाले? नाशिकच्या छापेसत्रावरून राऊत यांचा केंद्राला टोला

ता. १५ फेब्रुवारीअखेर महोत्सव आयोजित करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. महोत्सवासाठी करावयाचा खर्च स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवांतर्गत महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे उपलब्ध असलेल्या निधीतून भागविण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

त्या अनुषंगाने महामंडळ महोत्सवासाठी मंजूर करण्यात आलेला ७३ कोटी १० लाखांचा निधी सांस्कृतिक कार्य संचालनालयास उपलब्ध करून देईल. जिल्हाधिकाऱ्यांनी महोत्सवाचे आयोजन १५ फेब्रुवारीपूर्वी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

funding
Nashik News : सिडकोतील अनेक भागात पाण्याचा अपव्यय! पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.