Manmad Bazar Samiti Election Result : मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत मविआच्या परिवर्तन पॅनलची बाजी

Manmad Bazar Samiti
Manmad Bazar Samitiesakal
Updated on

Manmad Bazar Samiti Election Result : नांदगाव विधानसभा मतदार संघातील सर्वसामान्य जनता ही सध्याच्या नेतृत्वामुळे त्रस्त असून ग्रामपंचायत, सोसायटीसह शेतकरी बांधवांनी छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या परिवर्तन पॅनलवर विश्वास दाखविला आहे.

मनमाड बाजार समितीची ही निवडणूक आगामी नांदगाव मनमाड विधानसभा मतदार संघातील परिवर्तनाची नांदी आहे अशी प्रतिक्रिया माजी खासदार समीर भुजबळ यांनी व्यक्त केली. (Mahavikas Aghadi sameer bhujbal parivartan panel wins in Manmad Agricultural Produce Bazar Samiti election result nashik news)

मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजय संपादित केला. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

या निवडणुकीत माजी आमदार पंकज भुजबळ, माजी आमदार संजय पवार, माजी आमदार अनिल आहेर, माजी आमदार जगन्नाथ धात्रक, माजी आमदार राजेंद्र देशमुख यांनी महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडली.

या निवडणुकीत मतदारांनी महाविकास आघाडीच्या परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून दिले. त्याबद्दल समीर भुजबळ यांनी सर्वांचे मनःपुर्वक आभार मानले. ते म्हणाले की, नांदगाव विधानसभा मतदार संघातील नागरिक हे सध्याच्या लोकप्रतिनिधीच्या गुंडगिरी आणि दबावाला कंटाळून विकासाच्या बाजूने कौल देत परिवर्तन केलं आहे.

मनमाड आणि नांदगांव मतदारसंघांतील मालेगाव मध्ये परिवर्तनाच्या बाजूने कौल दिला आहे तर नांदगाव बाजार समितीत जरी पराभव झाला असला तरी चांगली लढत आपण दिली.अतिशय कमी फरकाने आपले उमेदवार यात पराभूत झाले असले तरी मतदारांनी दिलेला हा कौल परिवर्तनाचा कौल आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.

Manmad Bazar Samiti
Market Committee Election Analysis : भाजपला अंतर्गत रस्सीखेच भोवली; आत्मपरीक्षणाची वेळ

काल आमदार सुहास कांदे म्हणाले होते की छगन भुजबळ हे माझ्यासमोर शून्य आहे या प्रश्नावर ते म्हणाले की,आजवर आम्ही शून्यातून विश्व निर्माण केलं आहे. शून्यातून सर्व निर्माण होत असते त्यामुळे आम्हाला कुणी शून्याची किंमत समजवू नये.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार यांनी आम्हाला सभ्यतेने राजकारण करण्याची शिकवण दिलेली आहे. त्यामुळे आम्ही खालच्या पातळीवर जाऊन कुठलही भाष्य करून राजकारण करणार नाही.

त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करून बोलल्याप्रमाणे आता राजीनामा द्यावा म्हणजे २०२४ ला आमच्यावर जो गुलाल पडणार आहे, तो २०२३ लाच पडेल अशी कोपरखळी कांदे यांना मारली.

मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडी प्रणित परिवर्तन पॅनलला अपक्षांसह १४ जागा, शिंदे गट ३ तर हमाल मापारी गट अपक्ष १ जागा मिळाली आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Manmad Bazar Samiti
Jalgaon Market Committee Election Result : शिवसेना बंडखोरांना धक्का; खडसे, देवकर, पाटलांचे यश

व्यापारी गटातील २ अपक्ष उमेदवार यांनी समीर भुजबळ यांची भेट घेऊन परिवर्तन पॅनलला पाठिंबा जाहीर केला असल्याने भुजबळांच्या नेतृत्वाखालील निवडून आलेल्या उमेदवारांची एकूण संख्या १४ झाली आहे.

या निवडणुकीतील सर्व सूत्र ऐनवेळी समीर भुजबळ यांनी हातात घेतली. त्यांनी या निवडणुकीत अतिशय सूक्ष्म असे नियोजन केले. त्यामुळे महाविकास आघाडी प्रणित शेतकरी विकास पॅनलला भरघोस यश मिळाले असल्याने या विजयाचे किंगमेकर हे माजी खासदार समीर भुजबळ हेच ठरले आहे.

मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत एकहाती सत्ता मिळवू असे म्हणणाऱ्या आमदार सुहास कांदे यांना मतदारांनी चांगलाच दणका दिला असून या निवडणुकीत त्यांचं पूर्णतः पानिपत झालं आहे.

Manmad Bazar Samiti
Market Committee Election Result : नांदगावला ‘शेतकरी विकास’चीच सत्ता! बाजार समितीत 15 जागांवर विजयी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()