Mahavitaran News: ट्रान्स्फॉर्मर जळाला तर महावितरणला कळवा; महावितरणतर्फे आवाहन

Mahavitaran
Mahavitaranesakal
Updated on

Mahavitaran News: ट्रान्स्फॉर्मर (रोहित्र) जळाल्यास अथवा बिघडल्यास त्या जागी लवकरात लवकर दुरुस्त ट्रान्स्फॉर्मर बसविण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार महावितरणने राज्यभर मोहीम सुरू केली आहे. (Mahavitaran appeal to report if transformer burn nashik news )

पण ट्रान्स्फॉर्मर जळाल्यानंतर त्याची माहिती महावितरणकडे प्राप्त होण्यास विलंब लागत असल्याने स्थानिक नागरिकांनी याबाबतची खबर १८००२१२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या टोल फ्री क्रमांकावर कळवावी किंवा मंडलस्तरावरील कार्यकारी अभियंत्यास कळवावी, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे.

गावातील ट्रान्स्फॉर्मर जळाला तर वीजपुरवठा खंडित होऊन गावकऱ्यांची गैरसोय होते. जळालेल्या ट्रान्स्फॉर्मरच्या जागी दुरुस्त ट्रान्स्फॉर्मर बसविण्यास विलंब होण्याची समस्या सोडविण्यासाठी महावितरणने सातत्याने प्रयत्न चालविले आहेत. त्यासाठी ट्रान्स्फॉर्मर ऑइल तातडीने उपलब्ध करणे, दुरुस्त ट्रान्स्फॉर्मरचा साठा तयार करणे असे विविध उपाय केले आहेत. ट्रान्स्फॉर्मर बदलणे व दुरुस्त करणे याचा आढावा मुख्यालयस्तरावर दररोज घेण्यात येतो.

Mahavitaran
Nashik Politics News: भुजबळ-भुसेंना चेकमेटसाठी कर्णिकांची एन्ट्री; गिरीश महाजनांचे वाढले बळ

या मोहिमेला यश आले असून, महावितरणला ट्रान्स्फॉर्मर बिघडल्याची खबर मिळाल्यानंतर कमाल तीन दिवसांत ट्रान्स्फॉर्मर बदलण्यात येत आहे. तथापि, ट्रान्स्फॉर्मर जळाला आहे, हेच उशिराने समजले तर प्रत्यक्षात वीजपुरवठा पुन्हा सुरू होण्यास अधिक विलंब लागत असल्याची समस्या जाणवत आहे.

यावर मात करण्यासाठी वीजग्राहकांनी जळालेल्या ट्रान्स्फॉर्मरच्या जागी दुरुस्त ट्रान्स्फॉर्मर बसवून लवकरात लवकर वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्याच्या महावितरणच्या मोहिमेस सहकार्य करावे आणि ट्रान्स्फॉर्मर बिघडल्याची खबर द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

वीजग्राहकांसाठी महावितरणचा टोल फ्री क्रमांक

महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून ट्रान्स्फॉर्मर जळाल्याची तक्रार करण्यासोबतच नाशिक मंडळातील वीजग्राहकांना नाशिक मंडळ कार्यालयाचे कार्यकारी अभियंता (प्रशासन) यांना ७८७५७६६०२० या क्रमांकावर, तसेच मालेगाव मंडळातील वीजग्राहकांना मालेगाव मंडळ कार्यालयाचे कार्यकारी अभियंता (प्रशासन) यांना ९०२९११६०१२ या क्रमांकावर खबर देता येईल. त्यासोबत याच क्रमांकाच्या व्हॉट्सॲपवर जळालेल्या ट्रान्सफॉर्मरचा फोटो आणि ठिकाणाचा तपशीलसुद्धा संबंधितांना कळविता येईल.

Mahavitaran
Rojgar Melava: नागपूर येथे 9 व 10 डिसेंबरला रोजगार मेळावा; या संकेतस्थळावर करा नोंदणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.