Nashik News : महिंद्रा अँड महिंद्राला 1528 कोटींचा नफा!

नाशिक प्रकल्पातील उत्पादन वाढवण्यासाठी उपाययोजनांवर भर
Mahindra & Mahindra
Mahindra & Mahindraesakal
Updated on

सातपूर (जि. नाशिक) : महिंद्र अॅन्ड महिंद्रच्या गेल्या वर्षी म्हणजे २०२२ अखेर सुमारे एक हजार ५२८ कोटींचा नफा झाल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. त्यात ‘थार’ या नव्या सेगमेंटमध्ये ग्राहकांची अधिक पसंती असल्याचेही कंपनीने नमूद केले आहे. (Mahindra & Mahindra profit of 1528 crore Emphasis on measures to increase production in Nashik project News)

कंपनीच्या वार्षिक स्थितीबाबतची आकडेवारी नुकतीच जाहीर झाली आहे, त्यात प्रामुख्याने कंपनीच्या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत गेल्या वर्षीच्या तुलनेत १४ टक्क्याने नफ्यात वाढ झाली आहे.

डिसेंबर २०२२ पर्यंत कंपनीला एक हजार ५२८ कोटींचा नफा झाल्याचे कंपनीने म्हटले आहे. दरम्यान नाशिकबरोबरच चाकण प्रकल्पातील उत्पादनवाढीसाठी कंपनीने विविध उपाययोजनांवर भर दिल्याचे म्हटले आहे.

महिंद्र कंपनीने नुकताच नाशिकसह चाकण (पुणे) येथे अधिक गुंतवणूक करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. शासनाच्या उद्योग विभागाने त्याबाबत माहिती दिली आहे. ई-वाहन तयार करण्यासाठी ही गुंतवणूक आहे.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

Mahindra & Mahindra
Satyajeet Tambe | माझा विजय हा पदवीधरांच्या सद्सद्विवेकबुद्धीचा विजय : आमदार सत्यजित तांबे

दुसरीकडे नाशिक प्रकल्पाची उत्पादन क्षमता वाढविण्यावरही भर दिला जात आहे. पूर्वी नाशिक प्रकल्पात साडेतीनशे वाहने दिवसाला तयार करण्यात येत होती, आता हा टप्पा पाचशेच्या पुढे गेला आहे.

येणाऱ्या काळात अजून उत्पादन क्षमतेत वाढ करण्यासाठी विविध अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असल्याचे कंपनीचे उपाध्यक्ष के. शयनाय व नाशिक प्रकल्पाचे प्रमुख व्यवस्थापक प्रदीप देशमुख यांनी म्हटले आहे.

Mahindra & Mahindra
Nashik News : शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत स्वाभिमानी महाराष्ट्रभर 22 फेब्रुवारीला रस्त्यावर उतरणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.