महिंद्र ॲन्ड महिंद्रच्या थार’चे १५ ला अनावरण! अनेक दिवसांपासूनची प्रतीक्षा संपणार..वाचा सविस्तर

thar mahindra.jpg
thar mahindra.jpg
Updated on

नाशिक / सातपूर : महिंद्र ॲन्ड महिंद्रच्या नाशिक प्रकल्पात तयार होत असलेल्या ‘थार’ या नव्या अवतारात येणाऱ्या एसयूव्ही गाडीचे अनावरण येत्या स्वातंत्र्यदिनी (ता. १५) करण्यात येईल, असे कंपनीतर्फे नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. या गाडीमुळे नाशिकमधील औद्योगिक चक्र अधिक वेगाने फिरण्यास मदत होईल, अशी अपेक्षा औद्योगिक क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे. 

महिंद्र थार’चे १५ ला अनावरण 
त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून उत्सुकता असलेल्या या नव्या अवतारातील ‘थार’ची प्रतीक्षा येत्या १५ ऑगस्टला संपणार आहे. महिंद्र समूहातील सर्वच दृष्टीने नवीन असलेली ‘थार’ ही महिंद्रची एसयूव्ही तंत्रज्ञान, आराम आणि सुरक्षितता या बाबतीत कित्येक पटींनी श्रेष्ठ असल्याचा दावा कंपनीने केला आहे. कच्च्या रस्त्यावरून धावण्याची क्षमता आणि या गाडीची विशिष्ट रचना या मूलभूत वैशिष्ट्यांबाबत कोणतीही तडजोड करण्यात आलेली नाही. थारच्या पारंपरिक चाहत्यांना ही नवीन गाडी आकर्षित करेलच, शिवाय थार आपल्या मालकीची असावी, अशी इच्छा बाळगणाऱ्या सर्वांना ती आनंद देईल. भारत स्वतंत्र झाल्यापासून, ‘महिंद्र क्लासिक्स’ने भारतीयांना नवीन तंत्रज्ञान अन्वेषित करण्यास आणि यापूर्वी कधीही केली नसेल अशी कार्ये करण्यास सक्षम केले आहे.

नाशिकमधील प्रकल्पात निर्मिती, औद्योगिक चक्राला येणार वेग 

थार ही गाडी या समृद्ध वारशाचा ध्वजवाहक आहे आणि महिंद्रच्या गुणसूत्रांची शुद्ध अभिव्यक्ती आहे. तिच्या नव्या अवतारात, वाहन चालवन्याचा आनंद परत मिळवणे हे उद्दिष्ट सामावलेले आहे. अन्य कोणत्याही वाहनामधून मिळू शकणार नाही अशी प्रातिधिनिक रचना व वाहन चालवन्याचा आनंद यांचे अपवादात्मक मिश्रण यात पाहवयास व अनुभवावयास मिळणार आहे. या गाडीच्या निमित्ताने नाशिक प्रकल्पातील सर्व वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, तसेच कामगारही मोठ्या प्रमाणावर आशावादी आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर महिंद्रने थार ही गाडी लाँच करण्याचे धारिष्ठ्य दाखवल्यामुळे कामगार वर्गाबरोबरच नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रात सकारात्मक पाऊल पुढे टाकल्याची भावना महिंद्रचे शेकडो वेंडर व लघुउद्योगांनी व्यक्त केली आहे. ज्या ज्या वेळी नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रावर विविध संकट अथवा मंदीचे सावट आले, त्या त्या वेळी महिंद्रने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत नवीन सेगमेंटमध्ये दमदार पाऊल टाकले. त्या अनुषंगाने औद्योगिक मंदीच्या चक्रातून बाहेर काढण्यात मोलाचे सहकार्य केले आहे.

गाडीचे उत्पादन युद्धपातळीवर सुरू

आता कोरोना संकटकाळात थारचे आनावर हे त्याचेच उदाहरण आहे. सध्या नाशिक प्रकल्पात गेल्या काही दिवसांपासून या गाडीचे उत्पादन युद्धपातळीवर सुरू केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. महिंद्रने नुकतेच दुसरी पाळीचेही काम सुरू करत, उत्पादन वाढवण्यावर भर दिला आहे. त्यामुळे गेल्या आनेक महिन्यांपासून घरी असलेल्या छोट्या-मोठ्या कंपन्यांमधील हजारो कामगारांना यामुळे हळूहळू रोजगारही उपलब्ध होत असल्याची भावना सातपूर व अंबड औद्योगिक क्षेत्रातील कामगार व्यक्त करत आहेत.  

संपादन - ज्योती देवरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.