Nashik : शाकांबरी नदीवरील मुख्य स्मशानभूमीचे रडगाणे थांबेना

The plight of the road leading to the cemetery.
The plight of the road leading to the cemetery.esakal
Updated on

नांदगाव (जि. नाशिक) : पावसाळा आला की अमरधाममध्ये जाण्याचा मार्गच शाकांबरीच्या पाण्याखाली गायब होत असतो. त्यामुळे गेल्या सहा- सात वर्षांपासून अनेक अंत्ययात्रा वेगळ्या मार्गाने जाण्याच्या घटनाही नित्याच्या बनल्या आहेत. पण, यापेक्षा अजून वेगळ्या प्रकारची समस्या देखील उदभवते.

ती म्हणजे वडाळकर वाडा परिसरातील नदीकाठच्या रहिवाशांचा शहराशी असलेला दळणवळणाचा मार्ग नसतो. मग मिळेल त्या रस्त्याने वाट शोधत गावात यावे लागते. यावर करण्यात येणाऱ्या उपाययोजना थातुरमातुर स्वरूपाच्या असल्याने पावसाळा संपला की मग समस्यादेखील मागे पडते, असाही अनुभव आहे. (main cemetery road washed away on Shakambari river Nashik Latest Marathi News)

नांदगावच्या मुख्य स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता केवळ स्मशानभूमीला जोडणारा नसून, शहराची नवीन वस्ती, आदिवासी वडाळकर वस्ती ते ग्रामीण भागाला जोडला जाणारा जुना पांझण रस्ता आहे. शाकांबरी व लेंडी नद्यांच्या संगमावरून रस्ता जातो. पूर्वी त्यावर सिमेंट पाईप टाकून जुजबी रस्ता तयार केला होता.

पुराने त्याची वाताहत झाली. त्यावर दीड कोटींचा पूल मंजूर झाल्याची बातमी जुनी झाली. प्रत्यक्षात पूल केव्हा होणार आणि मेल्यानंतरही खडतर रस्त्यावरून होणारा प्रवास केव्हा सुकर होणार, याचीच प्रतीक्षा नागरिकांना आहे. शहरातून मुख्य स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील शाकंबरी नदीवरील मोरी २००९ मध्ये आलेल्या महापुरात वाहून गेली.

The plight of the road leading to the cemetery.
कुत्ता गोळीसह नशेचा बाजार गरम; तरुणांच्या नशेखोरीमुळे गुन्हेगारीत वाढ

पावसाळ्यात नदीपात्रातून जाताना मयताचे नातेवाईक, खांदेकऱ्यांना तिरडीवरच्या प्रेताचा तोल सांभाळताना करावी लागणारी कसरत, अंगावर उभे राहणारे काटे हा अनुभव अतिशय दुर्दैवी असल्याच्या प्रतिक्रिया आहेत. प्रत्येक पावसाळ्यात मातीची भर घालून तात्पुरती मोरी तयार केली जाते. पण, पुरात ती टिकत नाही. बाजार समितीच्या पाठीमागे स्मशानभूमीमध्ये घडलेला किस्सा अजून नागरिक विसरलेले नाहीत.

प्रेताग्नी दिल्यानंतर काही मिनिटात आलेल्या पुराने लाकडी सरण ढासळले आणि प्रेत खांबाला जाऊन अडकले. या दुर्दैवी प्रसंगाला सामोरे गेलेल्या मयताच्या कुटुंबियांचे दु:ख बाजूला राहिले आणि दुसऱ्यांदा प्रेताग्नी देण्याची वेळ आली. आयुष्य काढल्यानंतर किमान शेवटचा प्रवास सुखकर व्हावा, अशी नागरिकांनी व्यक्त केलेली अपेक्षा वावगी नाही.

The plight of the road leading to the cemetery.
Bank Slip भरण्याच्या बहाण्याने तरुणाची फसवणूक; 40 हजार लंपास

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.